पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या महापालिकेच्या आवाहनाला गणेशभक्तांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, पाच दिवसांच्या गणेश विसर्जनाच्या दिवशी महापालिकेच्या केंद्रांवर तब्बल ३,५४१ मूर्ती संकलित झाल्या. याचबरोबर पाच टन निर्माल्यही जमा झाले.
यावेळी ४ ते ५ टन निर्माल्य मनपा कर्मचाऱ्यांकडून संकलित करण्यात आले. यंदा दरवर्षीप्रमाणे पीओपीच्या गणेशमूर्ती घरीच विसर्जन करण्यासाठी महापालिकेने ७५० किलो अमोनियम बायकार्बोनेट पावडरचे वाटप नागरिकांना केले आहे. तसेच उत्सवाच्या सातव्या आणि दहाव्या दिवशीही नागरिकांनी विसर्जित मूर्ती दान कराव्यात, असे आवाहन महापालिका आयुक्त कैलास जाधव आणि घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. आवेश पलोड यांनी केले आहे.
इन्फो..
पाचव्या दिवशी गणेश विसर्जन करताना नागरिकांनी ३ हजार ५४१ मूर्तींचे संकलन केले आहे. यात पंचवटीत १३१०, सातपूर विभागात १०८८, नाशिक पश्चिम विभागात ४८१, पूर्व विभागात ३७०, सिडकोत १२०, तर नाशिकरोड विभागात १७२ मूर्तींचे संकलन करण्यात आले आहे.