नाशिक : माणसाने उत्क्रांतीच्या काळात जगणे सुकर करण्यासाठी भाषेचा वापर करून समाजाची निर्मिती केली. परंतु, प्रतिष्ठा आणि अहंकार यांसारख्या गोष्टींमुुळे माणूस याच समाजात स्वत:चे वैयक्तिक नुकसान करून घेत असल्याचे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी केले आहे.गोदाघाटावरील यशवंत महाराज देवमामलेदार पटांगणावरील वसंत व्याख्यानमालेत २५वे पुष्प गुंफताना ‘माणूस आणि त्याचं जगणं’ विषयावर ते बोलत होते. स्व. माणिकलाल भटेवरा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शनिवारी (दि. २५) त्यांनी व्याख्यान देताना मानवाच्या उत्क्रांतीच्या विविध अवस्थांचे वर्णन करताना सद्यस्थितीत मानवी जगण्यातील वास्तविक तेवर भाष्य केले. डॉ. दिलीप धोंगडे म्हणाले, माणूस हे एक अजब रसायन आहे. त्याची उकल करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले असून, अजूनही ते विविध माध्यमांतून सुरू आहे. अनेक विचारवंतानी माणसाच्या जगण्याची मिमांसा केली आहे. यात प्रतिष्ठा आणि अहंकार मानवाच्या जगण्याचा घात करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रतिष्ठा आणि अहंकारात कधीही न अडकता काम करत राहिले पाहिजे. माणसाचे दुटप्पी वागणे, बोलणे हे नेहमी त्याच्या स्वार्थावर अवलंबून असल्याचेही त्यांनी सांगितले.आजचे व्याख्यानविषय : लोकसभा निवडणूक-२०१९ निकालाचा अन्वयार्थवक्ते : सुरेश भटेवरा
अहंकारामुळे माणसाचे वैयक्तिक नुकसान : धोंडगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:51 AM