सिन्नर : तालुक्यातील पिंपळे शिवारात म्हाळुंगी नदीवर ७० मीटर लांब कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याचे काम प्रगतीपथावर आहे.या बंधाºयासाठी सुमारे ४९ लाख रूपयांचा निधी मंजूर झालेला आहे. यानुसार जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागांतर्गत कोल्हापूर टाईप बंधाºयाचा प्रस्ताव सादर केला. पाठपुरावा करून त्यास मंजुरी मिळवण्यात आली. आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, युवा नेते उदय सांगळे यांनी ही माहिती दिली.बंधाºयाचे काम प्रगतीपथावर असून पाऊस लांबल्यास येत्या दहा-बारा दिवसांत काम पूर्ण होण्याची शक्यता लपाचे अभियंता एस. एम. थोरात यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान बंधाºयाची पाहणी केली त्याप्रसंगी सांगळे यांच्यासमवेत सरपंच डॉ. राजेंद्र बिन्नर, संजय पानसरे, पोपट रूपवते, सुभाष घुगे, रामदास रूपवते, आर. टी. शिंदे आदी उपस्थित होते. (23येवला रेन०२)