शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

बस कंपनीवरून मनपात ‘खडखड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 1:23 AM

महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक सुरू करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात परिवहन समिती स्थापन करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात मात्र भाजपाच्या महापौरांनी बस कंपनी करण्याचा ठराव प्रशासनाला पाठविला. त्यामुळे इतिवृत्तातील चुकीवरून संतप्त झालेल्या विरोधकांनी शनिवारी (दि.१९) महासभेत जाब विचारत गोंधळ घातला. राष्टÑवादीचे गटनेते गजानन शेलार यांनी थेट पीठासनावर जाऊन राजदंडाला हात घातला. त्यामुळे महापौर रंजना भानसी यांनी सभेचे कामकाज गुंडाळून सभा संपवली.

ठळक मुद्देचर्चा परिवहनची, ठराव केला कंपनीचा शेलार आक्रमक; महापौरांनी गुंडाळले कामकाज

नाशिक : महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक सुरू करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात परिवहन समिती स्थापन करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात मात्र भाजपाच्या महापौरांनी बस कंपनी करण्याचा ठराव प्रशासनाला पाठविला. त्यामुळे इतिवृत्तातील चुकीवरून संतप्त झालेल्या विरोधकांनी शनिवारी (दि.१९) महासभेत जाब विचारत गोंधळ घातला. राष्टÑवादीचे गटनेते गजानन शेलार यांनी थेट पीठासनावर जाऊन राजदंडाला हात घातला. त्यामुळे महापौर रंजना भानसी यांनी सभेचे कामकाज गुंडाळून सभा संपवली. या सभेनंतर विरोधकांनी प्रतिसभा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु गोंधळ मॅनेज असल्याचा आरोप कॉँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील यांनी केल्याने गजानन शेलार आणि त्यांच्यात खडाजंगी झाली आणि ही प्रतिसभाही गुंडाळली गेली.महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक सुरू करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रस्ताव सादर केला होता. त्यात त्यांनी बस कंपनी स्थापन करण्याची तरतूद प्रस्तावित केली होती. परंतु सत्तारूढ भाजपाने बस कंपनीऐवजी परिवहन समिती स्थापन करावी तीच कायद्यात तरतूद आहे, असे त्यावेळी नमूद केले आणि महापौर रंजना भानसी यांनी तशी घोषणाही केली होती. त्यावेळी कॉँग्रेस, राष्टÑवादी आणि मनसेने बससेवेलाच विरोध केला होता. परंतु यांसदर्भातील कोणतीही नोंद त्या सभेत घेण्यात आली नाही. सप्टेंबर महिन्याचे इतिवृत्त शनिवारी (दि.१९) महासभेत मंजुरीसाठी मांडण्यात आले होेते. दुपारी बारा वाजता सभेचे कामकाज सुरू होताच राष्टÑवादीचे गजानन शेलार यांनी इतिवृत्त मंजुरीच्या विषयाला आक्षेप घेतला आणि आपण दिलेले पत्र वाचून दाखवण्यास सांगितले. महापौरांनी त्यांना दाद न देताच खाली बसण्यास सांगितले. यामुळे शेलार अधीकच आक्रमक झाले आणि त्यांनी अशाप्रकारचे काम चालणार नाही, असे सांगत पीठासनावर धाव घेतल्याने गोंधळ सुरू झाला.महापौर रंजना भानसी यांनी त्यांना पीठासनावरून खाली जाण्यास सांगितले, परंतु ते खाली तर उतरले नाहीत उलट राजदंडालाच हात घातला आणि तो पळवण्याची तयारी केल्याने महापौरांचा नाईक धावला आणि राजदंड पकडला. गदारोळ सुरू झाल्याने महापौरांनी तातडीने सर्व विषय मंजूर झाल्याचे जाहीर करून सभा गुंडाळली.तीन महत्त्वपूर्ण विषयांवर स्वतंत्र चर्चामहापालिकेच्या मिळकती भाड्याने देण्याचे सर्वाधिकार आयुक्तांना देणे, मखमलाबाद शिवारात हरित क्षेत्र विकास करण्यासाठी इरादा जाहीर करणे तसेच महापालिकेच्या शाळांमध्ये अक्षयपात्र योजनेची अंमलबजावणी करणे हे तीन विषय वगळता महापौर रंजना भानसी यांनी सर्व विषय मंजूर केल्याचे जाहीर केले. या विषयांवर स्वतंत्र महासभा घेण्यात येईल, असे महापौरांनी सांगितले. त्यामुळे आता या विषयांसाठी पुढील महासभेची वाट पहावी लागणार आहे.सेना ‘रामायण’वर, महापौर लग्नाला!महापालिकेच्या महासभेत झालेल्या गदारोळानंतर शिवसेनेचे सर्व नगरसेवक विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली महापौरांना भेटण्यासाठी गेले आणि कामकाज योग्य पद्धतीने होत नाही, तसेच परिवहन समितीचा ठराव झाला असताना बस कंपनीचा ठराव प्रशासनाकडे का पाठविण्यात आला, याची चौकशी करण्यासाठी गेले. परंतु महापौर आणि भाजपाचे सर्व पदाधिकारी गायब होते. एका लग्न सोहळ्यासाठी ते गेल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMayorमहापौरcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस