नाशिक : महापालिकेच्या सात ठेकेदारांनी बिले मिळत नसल्याची तक्रार थेट आयुक्तांकडे केल्यानंतर त्याची गंभीर दखल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घेतली आहे. रनिंग बिले असतानाही ती का दिली जात नाही याबाबत अधीक्षक अभियंता आणि मुख्य लेखापाल सुहास शिंदे यांना नोटीस बजावण्यात आली आहे.महापालिकेत कोणतेही काम सुरू झाल्यानंतर ठराविक काम झाल्यानंतर अभियंते मोजमाप करून रनिंग बिले सादर करीत असतात. ठेकेदारांची ही बिले खातेप्रमुखांना दिल्यानंतर ते लेखा विभागाकडे सादर करतात आणि त्याची पडताळणीची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर बिले देत असतात. परंतु तक्रारकर्त्या सात ठेकेदारांची बिले सादर केल्यानंतरदेखील ती मिळत नसल्याची तक्रार आहे. मध्यंतरी आयुक्त राधाकृष्ण गमे आणि मुख्य लेखापाल सुहास शिंदे यांच्यात वाद झाले होते. त्यामुळे शिंदे हे बिले काढत नसल्याची चर्चादेखील या दरम्यान पसरली होती.खातेप्रमुखांकडून बिलांसोबत कामाच्या पूर्णत्वाबाबतचे प्रमाणपत्र आले नसल्याने बिल रखडल्याचे समजते. त्यानंतर उपआयुक्त (प्रशासन) यांनी अधीक्षक अभियंता आणि मुख्यलेखापाल सुहास शिंदे यांना नोटीस बजावली आहे.
मनपात अधीक्षक अभियंता, मुख्य लेखापालास नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 1:18 AM
महापालिकेच्या सात ठेकेदारांनी बिले मिळत नसल्याची तक्रार थेट आयुक्तांकडे केल्यानंतर त्याची गंभीर दखल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घेतली आहे. रनिंग बिले असतानाही ती का दिली जात नाही याबाबत अधीक्षक अभियंता आणि मुख्य लेखापाल सुहास शिंदे यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
ठळक मुद्देवादाचा रंग दिला जात असल्याने आयुक्त गंभीर