नाशिक : मिरजच्या मिशन हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले डॉ. एस. व्ही. सोरटूर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाल्याने अनेक आदर्श गोष्टी उमेदवारीच्या काळातच शिकून आत्मसात करता आल्या. फारशी साधने नसतानाही त्या काळात त्यांचे डायग्नोसिस म्हणजे शेवटचा शब्द मानला जात होते. त्यातूनच कमीत कमी चाचण्यांमध्ये परफेक्ट डायग्नोसिस करता आले पाहिजे ही शिकवण त्यांनी आमच्यात रुजवली. तसेच त्या काळात नव्यानेच येत असलेले इको, कलर डॉप्लर, कॅथलॅब याच्यासह कोणत्याही नवीन बाबी त्वरित आत्मसात करण्याचे भानही त्यांनीच दिले. कमीत कमी खर्चात चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे भान त्यांनी दिले. त्याकाळी त्यांची दिवसाला किमान १५० नागरिकांची ओपीडी असायची. त्यातूनच सकाळपासून रात्री उशिरापर्यंत अविरत सेवारत राहण्याचा कानमंत्रदेखील त्यांनी दिला. या सर्व शिकवणुकीला आत्मसात करून गत तीन दशके आणि कोरोना काळात सेवा दिल्याचे समाधान आहे.
-डॉ. अतुल वडगावकर, एम.डी.
------------------------------------
गुरुपौर्णिमा विशेष --
फोटो
२२डॉ. वडगावकर
२२डॉ. सोरटूर