महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानच्या वतीने वेदपाठशाळेचे छात्र, अध्यापक व विश्वस्तांनी गेल्या सहा महिन्यांत आपापल्या घरी गणपती अथर्वशीर्षाचे सव्वा लाख पाठ पूर्ण केले आहे. या पाठांची सांगता मुंबई येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात वेदमूर्ती रवींद्र पैठणे गुरुजी यांच्या अधिपत्याखाली करण्यात आला. यावेळी ऋग्वेदाचे पठण पुणे येथील वेदाचार्य दत्तात्रय नवाथे, वेदमूर्ती अमेय नवाथे, यजुर्वेदाचे पठण नाशिकचे वेदाचार्य रवींद्रशास्त्री पैठणे, वेदमूर्ती दिनेशशास्त्री गायधनी यांनी, तर सामवेदाचे पठण परभणी येथील वेदाचार्य श्रीकृष्णाशास्त्री पळसकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि अथर्ववेदाचे पारायण बेंगलोर येथील वेदाचार्य रितेशशास्त्री जोशी, वेदमूर्ती कृष्णाशास्त्री जोशी यांनी केले. वेदमूर्ती गोविंदशास्त्री पैठणे, दर्शनशास्त्री देव, वेदमूर्ती भागेश तिवारी तसेच मुंबईमधील भागवताचार्य मगनभाई राजगुरू, वेदमूर्ती रवीशास्त्री राजगुरू, दिनेशशास्त्री राजगुरू, वेदमूर्ती प्रवीणभाई पंड्या यांच्यासह २१ वैदिक विद्वानांद्वारे अथर्वशीर्षाचे पठण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मगनलालजी ठक्कर ठाणावाला, मुख्य मंदिराचे पुजारी बाळकृष्ण सप्रे, मंदिर प्रशासनाचे सहकार्य केले.
छायाचित्र आर फोटाेवर १४ वेद नावाने सेव्ह