ओझर : येथील एचएल प्रवरा एव्हिएशन इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.येथील बीएससी एरोनॉटिकल सायन्समधील पदवीच्या दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांची कॉलेज फी बाकी असल्याचे कारण देत विद्यार्थ्यांना कॉलेज व्यवस्थापन परीक्षेपासून व आॅनलाइन अभ्यासक्र मापासून वंचित ठेवत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याची दखल घ्यावी यासाठी पालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत या प्रकरणात लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची विनंती केल्याने गिरीश कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य सी. आर. मिश्रा यांना निवेदन देण्यात आले. यावेळी श्याम उगले, तुषार गांगुर्डे, प्रतीक्षा नारद, संग्राम दाभाडे, जयेश ढिकले, सुयोग गायकवाड, विकी मोरे, नाना पवार आदी उपस्थित होते.
मनविसेचे विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 12:20 AM
ओझर : येथील एचएल प्रवरा एव्हिएशन इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
ठळक मुद्देपरीक्षेपासून व आॅनलाइन अभ्यासक्र मापासून वंचित