नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम आहे. मंगळवार (दि. २१) शहरातील बाधितांमध्ये १८० जणांची, तर जिल्ह्यात १५४ अशा एकूण ३३४ रुग्णांची वाढ झाल्याने बाधितांची संख्या तब्बल १० हजार २५वर पोहोचली. शिवाय कोरोनाने १४ बळीदेखील घेतल्याने मृतांचा आकडा ४१२ वर पोहोचला आहे.जिल्ह्यात मंगळवारी बळी गेलेल्यांमध्ये नाशिक शहरातील सहा नागरिकांचा समावेश आहे, तर ग्रामीणमध्ये निफाड तालुक्यातील दोन, तर येवला, इगतपुरी, सटाणा आणि नाशिक तालुक्यांतील प्रत्येकी एक नागरिक बाधित झाला आहे. त्याशिवाय जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव आणि नगर जिल्ह्यातील संगमनेरचा एक नागरिकदेखील कोरोनाला बळी पडला आहे. दरम्यान, मंगळवारी कोरोनातून बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांच्या संख्येतदेखील वाढ झाली आहे. तब्बल ३८० कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, मंगळवारी दाखल झालेल्या रुग्णांची संख्येत तब्बल ९३६ने वाढ झाली आहे.मृतांत नऊ महिलांचा समावेशमंगळवारी बळी गेलेल्या १४ नागरिकांमध्ये तब्बल नऊ महिलांचा समावेश आहे. बळींमध्ये पुरुषांपेक्षा महिलांचे प्रमाण अधिक असण्याचा प्रकार प्रथमच घडला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये आता पुरुषांइतक्याच महिलादेखील कोरोनाच्या कक्षेत आल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.१०५१ अहवाल प्रलंबितजिल्ह्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असताना मंगळवारी प्रलंबित अहवालांची संख्या १०५१वर पोहोचली आहे. प्रलंबित अहवालांची संख्या हजारावर राहण्याचे प्रमाण वाढले असून, त्यावर आरोग्य यंत्रणेला वेळीच आवर घालावा लागणार आहे.
जिल्ह्यात एकाच दिवसात तब्बल १४ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 1:12 AM