जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पाच किंवा पाचपेक्षा अधिक बळी गेले असल्याने बळींमध्ये होत असलेली सातत्यपूर्ण वाढ नागरिकांच्या चिंतेत भर घालणारी आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या एक लाख २५ हजार ३३२ वर पोहोचली असून, त्यातील एक लाख १९ हजार ४९० रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात ३,७०९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९५.३४ वर आली आहे. त्यात नाशिक शहरात ९५.३७, नाशिक ग्रामीण ९६.१२, मालेगाव शहरात ९०.००, तर जिल्हाबाह्य ९३.५९, असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या पाच लाख ५६ हजार ९२७ असून, त्यातील चार लाख २९ हजार ०७१ रुग्ण निगेटिव्ह, तर एक लाख २५ हजार ३३२ रुग्ण बाधित आढळून आले आहेत, तर २,५२४ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.
तब्बल ६४५ बाधित; ३६४ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 4:14 AM