लोकमत न्यूज नेटवर्कवणी : महाराष्ट्राचे अर्धपीठ म्हणून परिचित असलेल्या सप्तशृंगगडावर गुरुपौर्णिमा उत्सवानिमित सुमारे ८० हजार भाविकांनी हजेरी लावून सप्तशृंगीचे दर्शन घेतले. सुटीचा दिवस रविवार व गुरुपौर्णिमा असा दुग्धशर्करा योग साधत आज गडावर भाविकांची रीघ लागली होती. उत्सवानिमित्त देवीच्या पादुका व सुवर्णालंकारांची मिरवणूक न्यासाच्या मुख्य कार्यालयापासून मंदिराच्या पहिल्या पायरीपर्यंत काढण्यात आली. विश्वस्त, ग्रामस्थ, अधिकारी व भाविक यात सहभागी झाले होते. मंदिरात सदर सुवर्णालंकार नेण्यात आले व देवीचा साजशृंगार करण्यात आला.
असंख्य भाविकांची गडावर हजेरी गुरुपौर्णिमा उत्साहात
By admin | Published: July 09, 2017 11:06 PM