नाशिक- आज दुपारी दीड तासात शहर परीसरात तीस मिलीमीटर झालेल्या पावसाने सराफ बाजार, हुंडीवाला लेन, दहीपुल या भागात पाण्याचे लोंढे वाहून गेले. त्यात वाहून जाणाऱ्या दुचाकी आणि दुकांनाचे साहित्य हटवताना व्यापारी व्यावसायिकांची दमछाक झाली. त्यानंतर महापालिकेचे अधिकारी आले मात्र, त्यांनी साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याऐवजी व्यवसायिकांनाच सूचना दिल्याने व्यवसायिक संतप्त झाले.
आज दुपारी झालेल्या पावसामुळे संपुर्ण सराफ बाजार, भांडी बाजार, कापड पेठ या भागात पाणी साचले. ओकाची तालीम हा खेालगट भाग असून त्याठिकाणी साचलेल्या पाण्याने तर दुचाकी पाण्यात बुडाल्या. अनेकांना तेथून आपल्या मोटारी आणि दुचाकी हलवाव्या लागल्या. दुकानातील साहित्य वाचवताना तारांबळ उडाली. गेल्या काही पावसाळ्यांचा अनुभव अत्यंत विदारक असल्याने अनेक सुवर्णकारांनी तसेच कारागिरांनी साहित्य स्थलांतरीत केले.
नाशिक महापालिकेला कळवल्यानंतर विभागीय अधिकाऱ्यांनी मोटार या ठिकाणी आली. मात्र, पाणी निचरा करण्यासाठी कोणत्याही उपाययोजनांसाठी साहित्य आले. नैसर्गिक दृष्ट्या सुमारे तासभराने पाण्याचा निचरा झाला. स्मार्ट सिटीच्या सदोष कामांमुळे पाणी साचणारच होते. त्याबाबत त्याच वेळीसूचना करूनही कामात सुधारणा करण्यात आला नाही, त्यामुळे पुन्हा एकदा समस्या निराकरण झाले असून त्याचे कायम स्वरूपी निरकारण करावे अशी मागणी सराफ असोसिएशनचे अध्यक्ष चेतन राजापूरकर तसेच कृष्णा नागरे यांनी केली आहे.