नाशिक : मराठा समाजातील मोठा वर्ग अल्पभूधारक, बेरोजगार आणि बिकट आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून दूर आहे. आरक्षण नसल्याने नोकरी व शिक्षणात संधी उपलब्ध होत नसल्याने समाजाची परिस्थिती आणखीनच खालावत असल्याचे व्यक्त करीत मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची गरज असल्याची भूमिका नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सोमवारी (दि.२१) रावसाहेब थोरात सभागृहाजवळील मैदानातील मराठा समाजाच्या मूक आंदोलनात उपस्थित राहून स्पष्ट केली.
मराठा समाजातील विद्यार्थी गुणवत्ता असून, आरक्षण नसल्याने उच्चशिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यांना नोकरीच्याही अनेक संधी गमवाव्या लागत असल्याचे यावेळी उपस्थितीत लोकप्रतिनिधींनी मान्य केले. मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींसोबतच जिल्ह्यातील विविध समाजातील लोकप्रतिनिधींनीही मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.
कोट-१
शेतकरी मराठा समाज अल्पभूधारक झाला आहे. उपासमार आणि शिक्षणापासून वंचित अशी समाजाची परिस्थिती आहे. आरक्षण मिळालं तर समाज पुन्हा उभा राहू शकतो. राज्याला अधिकार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने ३४२ अमध्ये दुरुस्ती करून केंद्राकडे पाठवाव्यात. संसदेत आम्ही सर्व खासदार पाठिंबा देऊ.
हेमंत गोडसे, खासदार, नाशिक
कोट-१
मराठा समाजाच्या आरक्षणाला दिल्लीतही महाराष्ट्रातील सर्व खासदारांचा पाठिंबा आहे. दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. आता पुन्हा अभ्यासपूर्ण आणि योग्य माहिती सादर करायला हवी, अभ्यासू टीम नेमून राज्याने परिपूर्ण माहिती केंद्राकडे पाठविणे आवश्यक आहे. केंद्रात आरक्षणासाठी पाठपुरावा करू,
- डॉ. भारती पवार, खासदार, दिंडोरी
कोट-३
संभाजीराजे यांनी आंदोलनाला ठोस दिशा दिली आहे. त्यांनी सरकारला दिलेल्या ११ कलमी कार्यक्रमासाठी सर्व लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ३३८ बचा प्रस्ताव राष्ट्रपतींना पाठवण्यासाठी राज्य सरकारवर दबाव निर्माण करू.
- माणिकराव कोकाटे, आमदार, सिन्नर
कोट-४
मराठा समाजाने आतापर्यंत सर्व समाजांचा मोठा भाऊ म्हणून मदत केली आहे. मात्र या मोठ्या भावाला आज मदतीची गरज आहे, अशा परिस्थिती सर्व समाजातील घटक मराठा समाजासोबत असून, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी सर्वांचीच भूमिका आहे.
-सरोज अहिरे, आमदार, देवळाली
--------
कोट-५
मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची समस्या सोडविण्यासाठी निधी मिळवून देण्याची गरज आहे. निधी उपलब्ध होत नसेल तर समाजाने निधी गोळा करून वसतिगृह बांधण्यासाठी नियोजन करावे. आरक्षण नसल्याने मराठा समाजाला अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते आहे, त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण नाकारल्यानंतर तातडीने मुख्यमंत्र्यांना तोडगा काढण्यासाठी साकडे घातले आहे.
- सीमा हिरे, आमदार, नाशिक पश्चिम
-----
कोट-६
- मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा आहे. मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यासाठी आपण एकत्रित लढायला हवे.
राज्य सरकारने सारथी संस्थेच्या सक्षमीकरणासह वसतिगृहासारख्या मागण्या गांभीर्याने घ्याव्यात, नाशिकमध्ये वसतिगृहासाठी जागा उपलब्ध आहे. सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा.
- देवयानी फरांदे, आमदार, नाशिक मध्य
-----
कोट-७
आरक्षण रद्द झाल्यामुळे मराठा समाजावर खरोखरच अन्याय झाला आहे, आरक्षण नसल्यानं मेरिट असूनही मराठा विद्यार्थ्यांना शिक्षणात डावलले जाते. त्यामुळे यासंदर्भात विधानसभेत जे मुद्दे मांडावे लागतील ते मांडणार आहे. तसेच केंद्राकडेही सरकारने प्रस्ताव पाठविण्यासाठी पाठपुरावा करू.
- हिरामण खोसकर, आमदार, इगतपुरी
--
कोट-८
- मराठा समाजाच्या ११ मागण्यांतील काही मागण्या मंजूर झाल्या आहेत. कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे, विधान परिषदेत या मुद्द्याला पाठिंबा देण्यासोबतच मराठा समाजाच्या मागण्यांसदर्भात पाठपुरावा सुरू आहे.
- नरेंद्र दराडे, आमदार विधान परिषद
----
कोट-९
मराठा समाज मोठा आहे. नेतृत्व अनेक आहे; मात्र संभाजीराजे यांचे नेतृत्व सर्वांनाच मान्य आहे. त्यांच्यात समाज एकत्र करण्याची ताकद आहे. समाजाने दिलेली जबाबदारी नियमित पार पाडली असून, मागील सरकारच्या काळात आरक्षणासाठी राजीनामाही दिला होता.
- डॉ. राहुल आहेर आमदार, चांदवड
---------
कोट-१०
मराठा आरक्षण लढ्याला दिशा मिळावी याकरिता सर्वांचेच प्रयत्न आहेत. आगामी अधिवेशनात विधानसभा सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यास त्यास संपूर्ण सहकार्याचा प्रयत्न राहील. आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाला कायम पाठिंबा आहे.
नरहरी झिरवाळ, विधानसभा उपसभापती
---------
कोट-११
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कायम समाजासोबत राहणार आहे. त्यासाठी एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलाविण्याच्या मागणीलाही समर्थन आहे. तसेच कोपर्डीच्या भगिनीला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार आहे. आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या तरुणांच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी मिळावी यासाठीही पाठपुरावा करणार आहे.
- सुहास कांदे, आमदार, नांदगाव
कोट- १२
मराठा समाजाच्या सर्व मागण्यांना पाठिंबा आहे. आरक्षणासाठी समाजाकडून घेण्यात येणाऱ्या निर्णयानुसार भूमिका घेऊन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, समाजाच्या मागण्यांनुसार काम करण्याची तयारी आहे.
- नितीन पवार, आमदार, कळवण
---
कोट-१३
आरक्षणाच्या मागणीसाठी पक्षीय जोडे न घालता समाजाबरोबर आहे. कोपर्डीच्या भगिनीला अद्याप न्याय मिळालेला नाही, आगामी अधिवेशनात हा मुद्दा उचलणार आहे. संभाजीराजे यांनी सुरू केलेल्या लढ्यातून ज्याप्रमाणे सूचना मिळतील, त्याप्रमाणे भूमिका पार पाडणार आहे.
- राहुल ढिकले, आमदार, नाशिक पूर्व
----
कोट- १४
मराठा समाजाची आरक्षणाची मागणी न्यायिक असून, मराठा समाजाला सामाजिक न्याय मिळायला हवा. मात्र, आज मराठा समाज वंचित झाला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाला पूर्णपणे पाठिंबा आहे. संभाजीराजेंच्या नेतृत्वाखात लवकरच समाजाला दिलासा मिळेल.
- सुधीर तांबे, आमदार, विधान परिषद
कोट- १५
मराठा समाजाच्या आरक्षणाला कोणाचाही विरोध नाही, त्यामुळे समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. राज्य सरकारचे त्यासाठी प्रयत्न सुरू असून, सर्वांचीच आरक्षणाविषयी सकारात्मक भूमिका आहे. त्यामुळे केंद्राने ५० टक्क्यांच्या अटीत बदल करण्याची गरज आहे.
- दिलीप बनकर, आमदार, निफाड
कोट-
मराठा समाजाची सध्याची स्थिती पाहता समजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. आरक्षणाच्या मुद्द्यावर समाजासोबत आहे. केंद्रात मराठा आरक्षणाचा विषय येईल, त्यावेळी केंद्र सरकारकडे आरक्षणासाठी आवश्यक तो सर्व पाठपुरावा करण्याचा प्रयत्न राहील.
- सुभाष भामरे, माजी केंद्रीय राज्यमंत्री