शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
4
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
5
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
6
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
8
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
9
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
10
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
11
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
12
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
13
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
14
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
15
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
16
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
17
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
19
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
20
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

मराठा क्रांती मोर्चा 26 नोव्हेंबरला विधानभवनावर धडकणार ; सरकारपुढे नियोजनाचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 6:13 PM

कोपर्डी येथे अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या अमानुष अत्याचार व हत्येचा निषेध करीत आरक्षण व अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर यासह वीस मागण्यांसाठी आवाज उठवित संपूर्ण मराठा समाज पेटून उठलेला मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आता २६ नोव्हेंबला विधानसभेवर धडकणार आहे. या आंदोलनाच्या तयारासाठी विभागनिहाय संवाद यात्रा काढण्यात येणार असून  येथील वरद लक्ष्मीलॉन्स येथे शनिवारी (दि.१०) नाशिक विभागाच्या बैठकीत अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदूरबारमधून मुख्यर्माने संवाद यात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. 

ठळक मुद्देमराठा क्रांती मोर्चा२६ नोव्हेंबला विधानसभेवर धडकणारआंदोलनाच्या तयारासाठी विभागनिहाय संवाद यात्रा नाशिक विभागीय बैठकीत संवाद यात्रेते नियोजन

नाशिक   कोपर्डी येथे अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या अमानुष अत्याचार व हत्येचा निषेध करीत आरक्षण व अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर यासह वीस मागण्यांसाठी आवाज उठवित संपूर्ण मराठा समाज पेटून उठलेला मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आता २६ नोव्हेंबला विधानसभेवर धडकणार आहे. या आंदोलनाच्या तयारासाठी विभागनिहाय संवाद यात्रा काढण्यात येणार असून येथील वरद लक्ष्मीलॉन्स येथे शनिवारी (दि.१०) नाशिक विभागाच्या बैठकीत अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदूरबारमधून मुख्यर्माने संवाद यात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, यापूर्वी स्वयंशिस्तीने आणि शांततेत लाखोंच्या संख्ये मार्चे काढणाऱ्या मराठा समाजाने यावेळी शांततेच्या मार्गानेच विधानभवनावर धडक देण्याचा निर्णय घेतला असला तरी वाहनतळ आणि गर्दीचे कोणतेही नियोजन केलेले नाही. त्यामुळे या नियोजनाची जबाबदारी यावेळी सरकारी यंत्रणांवर येऊन पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून शांततेत, शिस्तीत व संयमाने मराठा समाजाने सरकारसमोर मागण्या मांडल्या.ऐतिहासिक व अभूतपूर्व मराठा क्रांती मूक मोर्चांची सर्व जगाने नोंद घेतली. मात्र तरीही मराठा समाजाचे प्रश्न अद्यापही सुटले नाहीत. जिव्हाळ्याच्या आरक्षण प्रश्नासाठी पेटलेल्या आंदोलनात ४० पेक्षा अधिक मराठा तरुणांचे जीव गेले आहेत तर चौदा ते पंधरा हजार मराठा आंदोलकांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून सरकार मराठा समाजाच्या आंदोलनाला दुर्लक्षित करीत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांनी नाशिक जिल्हा विभागीय बैठकीत केला. त्याचप्रमाणे समाजाच्या सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय मराठा समाज स्वस्थ बसणार नाही. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुन्हा एकदा क्रांती मोर्चा राज्य समन्वय समिती विधानभवनावर धडक देण्याचा निर्धार करण्यात आल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजीव भोर,करण गायकर,तुषार जगताप, गणेश कदम, प्रमोद पाटील यांनी बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, बैठकीत नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांतील संवाद यात्रेचा मार्ग,स्वरूप,मराठा संवाद मेळाव्याची ठिकाणे याबाबत सूक्ष्म नियोजन करण्यात आले. त्यानुसार संवाद यात्रा अहमदनगर जिल्ह्यातून निघून जळगाव, धुळे, नंदूरबारमार्गे २४ नोव्हेंबरला नाशिकमधील  रामशेज किल्याच्या पायथ्याजवळ येणार आहे. याचठिकाणी संबधित चारही जिल्ह्यातील नाशिकमार्गे मुंबईकडे रवाना होणाºया आंदोलकांची उपहाराची व्यवस्था करण्यात येणार असून त्यानंतर २५ नोव्हेंबरला सकाळी आंदोलक मुंबईकडे प्रस्थान करणार असल्याचे अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांनी सांगितले. शरद तुंगार, राजू देसले, सचिन पवार, विलास जाधव, संदीप लभडे, अमित नडगे, सचिन शिंदे,योगेश कापसे, पूजा धुमाळ, सुजाता जगताप, अरुणा डुकरे आदि उपस्थित होते. 

विभागनिहाय संवाद यात्राआंदोलनासाठी समाजाच्या जनजागृतीसाठी शेवटच्या स्तरापर्यंत संवाद साधणे,समाजात जागृती करणे,मराठा तरुणांना आत्महत्यांपासून परावृत्त करण्यासाठी प्रबोधन करणे,तसेच मराठा आंदोलनाला निर्णायक दिशा देण्यासाठी १६ नोव्हेंबर ते२६ नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील प्रत्येक महसुली विभागात मराठा संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. २६ नोव्हेंबरला  विधिमंडळाच्या अधिवेशना दरम्यान सर्व महसूली विभागांच्या संवाद यात्रा एकत्रित विधान भवनावर धडक देणार आहेत. त्यानंतरही सरकाराने मराठा आरक्षणाविषयी सकारात्मक निर्णय घेतला नाही तर त्यापुढील आंदोवनाची दिशाही येथूनच ठरविण्यात येणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजीव भोर यांनी यावेळी सांगितले. 

नियोजनाची जबाबदारी सरकारवर मराठा क्रांती मोर्चाने आत्तापर्यंत संयमी आणि शाततेच्या मार्गाने मोर्चे काढण्यासाठी सुक्ष्म नियोजन केले होते. परंतु सरकाने मराठा समाजाच्या मागण्या गांभिर्याने घेतल्या नाही. त्यामुळे आता मराठा क्रांती मोर्चातर्फे केवळ मुंबईत विधानभवनावर धडकण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त वाहनतळांची व्यवस्था आणि नियोजन करण्याची जबाबदारी सरकारची असणार आहे. विशेष म्हणजे सर्व मराठा समाज बांधवांना त्यांच्या वाहनांनीच मुंबईत पोहोचण्याचे आवाहनही याबैठकीच्या माध्यमातून करण्यात आहे. 

मराठा क्रांती मोर्चाच्या मूळ आंदोलनाची धार कमी करण्यासाठी काही लोक स्वार्थी हेतूने एकतर्फी,मनमानीपणे बेजबाबदारपणे मराठा क्रांती मोर्चा नावाचा गैरवापर करून हिंसक आंदोलने किंवा राजकीय पक्षाच्या अनाठायी घोषणा करून समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न करीत आहेत. ठोक मोर्चा व मराठा क्रांती नावाची संघटना किंवा राजकीय पक्षाशी मराठा क्रांती मोर्चाचा कोणताही संबंध नाही. आरक्षणाविषयी भाजप सरकारने मराठा समाजास खेळवत ठेवून समाजाची घोर फसवणूक केली आहे. याविरोधात मराठा समाजात तीव्र संतापाची भावना आहे. मराठा समाजासाठी काही निर्णय घेतले असल्याचा कांगावा भाजप सरकार करीत असले तरीही प्रत्यक्ष मराठा समाजास अपेक्षित लाभ मिळालेला नाही हे वास्तव आहे.-संजीव भोर, राज्य समन्वय, मराठा क्रांती मोर्चा.

 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाNashikनाशिकMaratha Reservationमराठा आरक्षणagitationआंदोलनVidhan Bhavanविधान भवन