शहरं
Join us  
Trending Stories
1
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
2
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
3
हरयाणात निकालांनंतर भाजपाचं अर्धशतक पूर्ण, दोन अपक्ष आमदारांनी दिला पाठिंबा
4
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
5
फायद्याची बातमी! २०० रुपये वाचवून गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर २८ लाख मिळतील; LIC ची जबरदस्त योजना
6
वाढदिवस ठरला शेवटचा! केक, पापड आणि...; ५ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमागचं सत्य काय?
7
"बाप-बेटे हल्ली दारोदारी फिरतात, दारावर टक-टक करुन..."; आशिष शेलारांचे ठाकरे पिता-पुत्रांवर टीका
8
हरयाणा निकालामुळे भाजपाचं कमबॅक, मविआत संघर्ष; ठाकरेंचेही सूर बदलले, पडद्यामागचं राजकारण?
9
माधुरी की विद्या? नक्की कोण आहे मंजुलिका? कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैय्या ३' चा ट्रेलर रिलीज
10
जम्मू-काश्मिरमध्ये इंडिया आघाडीचे अवघे दोन हिंदू उमेदवार जिंकले, कोण आहेत ते? एकाने नोंदवला धक्कादायक निकाल  
11
Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एकाच दिवसात चांदी ₹२१२२ स्वस्त; Gold किती घसरलं?
12
₹६७ च्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ८ टक्क्यांची तेजी, एक घोषणा आणि स्टॉक सुस्साट
13
हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?
14
वकिलांकडून भाजपच्या आमदाराला पोलिसांसमोरच मारहाण; अर्बन बँक निवडणुकीतला प्रकार
15
राहुल गांधींनी मानले सर्व कार्यकर्त्यांचे आभार; हरयाणातील पराभवावर दिली प्रतिक्रिया, म्हणाले...
16
मुंबईतील हिंदी बहुल १२ मतदारसंघात परप्रांतीय उमेदवाराला प्राधान्य द्या; मविआला पत्र
17
"काँग्रेसच जिंकणार असं दाखवलं जात होतं...", हरयाणा निवडणुकीवर द ग्रेट खलीची प्रतिक्रिया
18
बापरे! होणारा नवरा सतत करायचा कॉल; मुलीने ब्लॉक करताच 'त्याने' केलं असं काही...
19
गुरु-शुक्र समसप्तक योग: ७ राशींना दसरा शुभ, मालामाल व्हाल; दिवाळीला धनलक्ष्मी प्रसन्न होईल!
20
5 लाखातून उभे केले 7000 कोटींचे साम्राज्य! Phanindra Sama चे स्टार्टअप काय?

पांगरीकरांचे ठिय्या आंदोलन स्थगित मराठा क्रांती मोर्चा : समन्वयकांसह नायब तहसीलदारांची मध्यस्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 6:54 PM

सिन्नर : गेल्या सहा दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने तालुक्यातील पांगरी येथे सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनास नाशिक व सिन्नर येथील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी भेट दिल्यानंतर नायब तहसीलदारांसोबत झालेल्या चर्चेतून पांगरीकरांनी मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याची घोषणा करण्यात आली.

सिन्नर : गेल्या सहा दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने तालुक्यातील पांगरी येथे सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनास नाशिक व सिन्नर येथील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी भेट दिल्यानंतर नायब तहसीलदारांसोबत झालेल्या चर्चेतून पांगरीकरांनी मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याची घोषणा करण्यात आली.मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांच्यासह सकल मराठा समाजाच्या पांगरी येथील बांधवांनी संत हरिबाबा मंदिराच्या प्रांगणात सोमवारपासून ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला होता. या आंदोलनास सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावून पाठींबा दिला होता. शांततेच्या मार्गाने सुरु केलेल्या या ठिय्या आंदोलनात दररोज शाहीरांचे पोवाडे व कार्यक्रम होत होते.मराठा समाजाच्या नाशिक येथील ठिय्या आंदोलनाला दगडफेकीचे गालबोट लागल्यानंतर राज्य समन्वय समितीचा पुढील निर्णय होईपर्यंत जिल्'ातील आंदोलनांना स्थगिती देण्यात आली होती. तथापि, पांगरी येथे गेल्या सहा दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरु होते. जिल्'ातील मराठा क्रांती मोर्चाने तात्पुरते आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांनी पांगरीकरांसोबत संवाद साधला होता. या पार्श्वभूमीवर माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासह नाशिक येथील समन्वयक गणेश कदम, करण गायकर, तुषार जगताप, राजू देसले, सिन्नर येथील शरद शिंदे, डी. डी. गोर्डे यांनी ठिय्या मोर्चाला बसलेले विलास पांगारकर यांच्यासह मराठा समाज बांधवांची भेट घेतली. नाशिक जिल्'ातील आंदोलन तात्पुरते स्थगित झाल्याचे सांगून आपणही आपल्या मागण्यांचे निवेदन शासनाकडे देवून आंदोलनाची सांगता करावी अशी विनंती करण्यात आली.मराठा आंदोलनाची इतक्या दिवस गांभीर्याने दखल न घेतल्याने त्याचे रुपांतर ठोक मोर्चात झाले असल्याचे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. मराठा समाजाचा असंतोष ठोक मोर्चातून दिसून आला. मात्र आंदोलन चुकीच्या मार्गाला गेले तर त्याचा त्रास पुढच्या पिढीला होईल. आंदोलन विधायक मार्गाने जावे. आत्महत्त्या व जाळपोळ होऊ नये यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे कोकाटे म्हणाले. समाजाला बदनाम करण्याचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी सर्वांनी शांततेच्या मार्गान जावे असा सल्लाही कोकाटे यांनी दिला. त्यानंतर विलास पांगारकर यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करीत असल्याची घोषणा केली.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा