नाशिक : जालण्यातील अंबड तालुक्यात साष्ट पिंपळगाव येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चाने पाठिंबा जाहीर केला आहे. या आंदोलनात राज्यभरातील विविध विविध संघटना सहभागी झाल्या असून नाशिकमधून छावा क्रांतीवीर संघटनेनेही या आंदोनलात सहभाग नोंदवून आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकारकडून टोलवाटोलवीचे उत्तर दिले जात असल्याचा आरोप करत साष्ट पिंपळगावच्या गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले असून गावकऱ्यांच्या भूमिकेचे छावा क्रांतीवीर संघटनेचा समर्थन करीत असल्याने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी स्पष्ट केले आहे. सरकार एकीकडे मराठा आरक्षण कोर्टात असल्याचे सांगत आहे, तर दुसरीकडे मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी असलेले सारथी संस्थेचे उपक्रम बंद केले जात आहे, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांमध्येही जाचक अटी लादल्याचा आरोपही त्यांनी केला असून या राज्य सरकारने त्यांच्या अधिकारातील मागण्या तत्काळ मान्य करून मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी छावा क्रांतिवीरसेनेच्या पदाधिकीर आणि कार्यकर्त्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे.
(आरफोटो-२२ छावा क्रांतीवर ) जालण्यातील अंबड तालुक्यात साष्ट पिंपळगाव येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात सहभागी छावा क्रातीवर संघटनेचे करण गायकर