देवळा : प्रत्येकाची भूमिका आरक्षण मिळावी हीच असेल तर यासाठी झेंड्याची गरज नाही. मराठा आरक्षण प्रश्नावर सर्व संघटनांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बाळकृष्ण विखे पाटील यांनी केले. देवळा येथे मराठा आरक्षणासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
देवळा येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात देवळा तालुका भाजपने बैठकीचे आयोजन केले होते. भाजपचे विरोधी पक्षनेते बाळकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार डॉ. भारती पवार, आमदार डॉ. राहुल आहेर, भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर, जिल्हा सरचिटणीस सुनील बच्छाव, भाजप तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण, कळवण तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, अतुल पवार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
मराठा समाजाच्या व्यथा यावेळी मांडण्यात आल्या. अंतर्गत वादविवादामुळे मराठा समाज आरक्षणापासून वंचित नको. आरक्षणाविषयी मराठा समाजात संभ्रम असून, भावना तीव्र आहेत, न्यायालयात टिकेल असे आरक्षण मिळवून द्या, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस राजू पगार, शाहू सिरसाठ, किशोर चव्हाण, दीपक जाधव आदींनी आपले मनोगत व्यक्त करताना केली. दीपक खैरनार यांनी आभार मानले.
---
मराठा आरक्षणासंदर्भात झालेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना राधाकृष्ण विखे पाटील. समवेत खासदार डॉ. भारती पवार, आमदार डॉ. राहुल आहेर, भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर आदी. (०८ देवळा १)
===Photopath===
080621\08nsk_11_08062021_13.jpg
===Caption===
०८ देवळा १