नाशिक : सकल मराठा समाजाच्यावतीने लाखलगाव येथील ग्रामस्थांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात शासन दिरंगाई करून वेळ काढूपणा करत असल्याचं म्हणत सरकारच्या निषेधार्थ मुंडण आंदोलन केले आहे. तरुणांवर आंदोलनाच्या माध्यमातून गुन्हे दाखल करत आहेत. मुलांना आत्महत्येस प्रवृत्त करत आहे. समाजाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान सरकार करू पहात आहेत. लवकर शासनाने हे थांबवलं नाही तर याची परिणाम वाईट होतील. आज फक्त मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. जेव्हा संपूर्ण समाज रस्त्यावर उतरेल तेव्हा महाराष्ट्र वेगळ्या वळणावर जाईल असा आरोप करीत यासर्व आंदोलन व मोर्चाची दखल शासनाने घ्यावी असे ग्रामस्थांनी म्हटले आहे.
आरक्षण, वस्तीगृह, मुलांना बिनव्याजी कर्ज, शेतकऱ्यांना कर्जमाफी याबाबतीत शासनाने फसवले आहे. याचा मुंडण करून ग्रामस्थांनी निषेध केला आहे. मराठा समाजाचे युवक विनायक कांडेकर, पप्पू कांडेकर, ऋषिकेश निरगुडे, पंकज ठिळे, गोकुळ कांडेकर,सोमनाथ कांडेकर, प्रवीण अनवट, अक्षय वळवे, निलेश वळवे, रुक्षिकेश अनवट, गणेश अनवट, आकाश वळवे, पवन वळवे यांनी मुंडण केलं आहे. त्यावेळी करण गायकर, तुषार जगताप, राजू देसले, गणेश कदम, यांनी तरुणांना मार्गदर्शन केलं. आंदोलनात संयम, शांततेचं आवाहन देखील केलं. त्यावेळी लांब्बे मामा, विलास कांडेकर, नामदेव कांडेकर, उमेश कांडेकर, मच्छींद्र वळवे आधी लाखलगाव व गंगावडाळी तसेच कलवी ग्रामस्थ व नावी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.