नाशिक : तोडफोड, हिंसा वा आत्महत्या करून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तर त्यासाठी कायदेशीर लढाई लढण्याबरोबरच सरकारच्या विरोधात अहिंसात्मक पद्धतीने आंदोलन करण्याचा मार्गच योग्य आहे़ आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांतर्फे समाजातील विचारवंताच्या परिसंवादाचे गुरुवारी (दि़ २) आयोजन करण्यात आले आहे़ यामध्ये समाजातील तज्ज्ञ व विचारवंताची ‘प्रोटोकॉल समिती’ स्थापन करण्यात येणार असून, त्यांच्या मार्गदर्शनानुसार आरक्षणाचे पुढील आंदोलन केले जाईल, अशी माहिती डॉ़ संदीप कोतवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली़
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी समाज आक्रमक झाला असून, राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे़ यामध्ये काही ठिकाणी तोडफोडीचे तर तर काही ठिकाणी शांततेत आंदोलन सुरू आहे़ नाशिक जिल्ह्यातही मराठा आरक्षण आंदोलन सुरू असून, ते विखुरलेल्या स्वरूपात आहे़ त्यामुळे समाजातील सर्वांना एकत्र आणण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी गंगापूर रोडवरील सावरकरनगर (नंदनवन लॉन्स) येथे बुधवारी (दि़ १) पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान वा आत्महत्या करून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही़ मराठा समाज एकत्र येऊन आंदोलनाचे नियोजन करतो; मात्र अंमलबजावणीसाठी स्वतंत्र यंत्रणा नाही़
नाशिक जिल्ह्यातील मराठा समाजातील विचारवंतांच्या गुरुवारी होणाऱ्या या परिसंवादात लोकप्रतिनिधी, वकील, पोलीस, पत्रकार अशा विविध क्षेत्रातील विचारवंत सहभागी होणार आहेत़ समाजातील सूज्ञ मंडळी, मान्यवरांचा समावेश असलेली एक प्रोटोकॉल समिती स्थापन करील व समितीच्या सूचनेनुसारच पुढील आंदोलने केली जातील़ या परिसंवादामध्ये समाजातील कोणतीही व्यक्ती सहभागी होऊ शकते, त्यामुळे राजकीय, सामाजिक वा आर्थिक समूह वा गटापर्यंत ही समिती मर्यादित राहणार नाही़ तसेच समाजासाठी योगदान देणारे तसेच दिशा देणाºयांचा समावेश सवानुमते प्रोटोकॉल समितीत केला जाणार असल्याचे डॉ़ कोतवाल यांनी सांगितले़
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची सुयोग्य दिशा ठरविण्यासाठी होणा-या परिसंवादात समाजातील लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, जि.प. सदस्य, नगरसेवकांना सहभागी होण्याचे आवाहन समन्वयकांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला चंद्रकांत बनकर, अक्षय झेंडे, प्रकाश चव्हाण, कल्याणी लोहोकरे, रसिका शिंदे, दर्शन सोनवणे, मुग्धा थोरात आदी उपस्थित होते.आमदारांच्या राजीनाम्याबाबत निर्णयमराठा आरक्षणास पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील दोन आमदारांनी राजीनामा लिहून दिला आहे. या राजीनाम्यांचे पुढे काय झाले याबाबत परिसंवादात चर्चा होऊन त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे़ यामुळे सर्व समन्वयकांनी या परिसंवादात सहभागी होऊन आपली भूमिका मांडण्याचे आवाहन समन्वयकांनी केले आहे.