येवला : तालुक्यातील निळखेडा येथे सकल मराठा समाजाची संघटन बैठक येथील मारु ती मंदिरात संपन्न झाली. यावेळी सकल मराठा समाजातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत मराठा क्र ांती मोर्चा समन्वयक समितीचे पांडुरंग शेळके पाटील, प्रविण निकम, सुदाम पडवळ, संतोष मढवई यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून बैठकीस सुरवात करण्यात आली. अध्यक्षस्थानी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पांडुरंग शेळके पाटील होते. यावेळी प्रा. प्रवीण निकम यांनी मराठा समाज ा नेहमीच मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिला असून आज आपल्या प्रश्नासाठी ५७ मूक मोर्चे काढूनही सरकार गप्प असेल तर त्यासाठी समाज एकत्र येणे गरजेचे असल्याचे सांगितले. सोशल मीडियावर असलेल्या लिंकला भेट देऊन सकल मराठा समाजाचे फॉर्म भरून समाजाच्या उन्नतीसाठी एक पाऊल उचलावे असेही त्यांनी सांगितले.मराठा तरु णांनी खचून जाऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे पांडुरंग शेळके पाटील यांनी सांगितले. आरक्षण हे न्याय प्रविष्ट असून आपण एकत्र आलो ताकद दाखवली तर नक्कीच दबाव वाढेल असे प्रमोद देवडे यांनी म्हटले. आज शैक्षणीक तसेच नोकऱ्यांमध्ये केवळ आरक्षण नसल्याने जास्त गुण असून सुद्धा आपल्या समाजातील तरु ण नोकरीपासून वंचीत आहेत. मराठा समाजाला पाय बांधून शर्यतीत उतरावे लागत त्यामुळे युवक दिशांहीन झाला आहे. असे यावेळी संतोष मढवई यांनी सांगितले. यावेळी जनार्दन कदम, मंगेश कदम, सागर कदम, साईनाथ आरोटे, तुषार कदम, रवींद्र कदम, मारु ती कदम, अनिल कदम, नितीन कदम,जगदीश आरोटे, सुभाष कदम, गणेश कदम, श्रावण कदम, सोमनाथ कदम आदींसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन जनार्दन कदम यांनी केले तर आभार मंगेश कदम यांनी मानले. क्र ांती मोर्चातील हुतात्मा समाजबांधवांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करून बैठकीची सांगता झाली.
निळखेड्यात मराठा समाजाची संघटन बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2018 7:08 PM