नाशिक : ज्यांच्या जयंतीच्या निमित्ताने राज्य शासनाने मराठी भाषा दिन सुरू केला त्या कविकुलगुरू कुसुमाग्रजांच्या नगरीतच मराठी दीन झालेली पहावी लागली. मंगळवारी या दिनाच्या निमित्ताने सकाळी कुसुमाग्रजांच्या निवास्थानी शांतता होतीच, परंतु महापौर रंजना भानसी यांनी कुसुमाग्रजांना अभिवादन करतानाच श्रद्धांजली अर्पण केली. त्यामुळे उपस्थितांना धक्का बसला. कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्ताने मराठी भाषा दिनाचे नाशिकसह राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी म्हणजे प्रतिष्ठानच्या कार्यालयात सकाळी नऊ वाजता अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले असले तरी सुशोभिकरण किंवा अन्य काहीही मराठी दिन सोहळ्यासारखे दिसले नाही. मोजकेच पदाधिकारी उपस्थित होते. विद्युतरोषणाई सोमवारी रात्रीपासूनच अपेक्षित असताना त्याचाही लवलेश नव्हता. रांगोळ्या किंवा अन्य कोणतेही सोपस्कार नव्हते. दुपारनंतर हे सर्व सुशोभिकरण सुरू झाले. अशा वेळी तब्बल दोन तास विलंबाने आलेल्या महापौरांनी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
नाशकात मराठी ‘दीन’, महापौरांनी जयंतीदिनी वाहिली श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 1:43 AM
नाशिक : ज्यांच्या जयंतीच्या निमित्ताने राज्य शासनाने मराठी भाषा दिन सुरू केला त्या कविकुलगुरू कुसुमाग्रजांच्या नगरीतच मराठी दीन झालेली पहावी लागली.
ठळक मुद्देकुसुमाग्रजांच्या निवास्थानी शांतताकोणतेही सोपस्कार नव्हते