देवळा : कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळ आयोजित मराठी भाषा गौरव दिन आणि कविवर्य कुसुमाग्रज जयंती साजरी करण्यात आली.महाविद्यालयाच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य हितेंद्र आहेर, तर कवी रवींद्र देवरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कुसुमाग्रजांचा जीवन परिचय मराठी विभागप्रमुख प्रा. रवींद्र पगार यांनी करून दिला. कवी रवींद्र देवरे यांनी वाचन संस्कृती जोपासण्याचे आवाहन केले. याप्रसंगी कविता सादर केल्या. मंडळाच्या वतीने कुसुमाग्रज यांच्या कवितांचे वाचन, निबंध वाचन, नाटकांवरील संवाद वाचन आदी उपक्रम यावेळी राबविण्यात आले. विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला. उपप्राचार्य डॉ. ए. बी. पवार यांनी पार्श्व संगीताचा वापर करून आपले गीत सादर केले. पायल लोढा हिने आभार मानले.चांदवड येथील वाचन संस्कृतीचे उपासक व ग्रंथप्रेमी कवी रवींद्र देवरे यांच्याकडे सुमारे स्वतःचे चार हजार ग्रंथ आहेत. त्यांच्या ग्रंथालयात सर्वांना ते वाचनासाठी विनामूल्य उपलब्ध करून दिले जातात.प्रा. रवींद्र पगार यांनी कुसुमाग्रजांचा जीवन परिचय करून दिला. यावेळी व्यासपीठावर कवी रवींद्र देवरे, प्राचार्य हितेंद्र आहेर व उपप्राचार्य ए. बी. पवार आदी उपस्थित होते.
देवळा महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 8:49 PM
देवळा : कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळ आयोजित मराठी भाषा गौरव दिन आणि कविवर्य कुसुमाग्रज जयंती साजरी करण्यात आली.
ठळक मुद्दे मंडळाच्या वतीने कुसुमाग्रज यांच्या कवितांचे वाचन