मनमाड : येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे, उपप्राचार्य डॉ. आंबेकर, कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या ज्योती बोडके, व्ही. आर. फंड, प्रा. जे. के देसले यांच्या हस्ते कविवर्य वि. वा. शिरवाडकर व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.उज्ज्वला होन, तृप्ती मोरे, स्नेहा शेजवळ, अनुष्का कुलकर्णी या विद्यार्थिनींनी कविता सादर केल्या. डॉ. जगदाळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कविवर्य शिरवाडकर यांचा जीवनपरिचय करून देत मराठी भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.प्रास्ताविक प्रा. अमोल देसले, सूत्रसंचालन प्रा.एस.डी.राजवाळ तर प्रा. पी. व्ही. आहिरे यांनी आभार मानले.
मनमाड महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 11:00 PM
मनमाड : येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
ठळक मुद्देसंतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व कविवर्य वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमांचे पूजन.