घोटी : मॅरेथॉन स्पर्धा जीवनाला कलाटणी देतात. ह्या क्र ीडा प्रकारांतून निरामय आरोग्याची गुरु किल्ली लपलेली आहे. शिहदांच्या स्मृती चिरंतन राखण्यासाठी आयोजित केलेल्या स्पर्धा सर्वांना प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन कळसुबाई मित्रमंडळाने अध्यक्ष प्रसिद्ध गिर्यारोहक भगीरथ मराडे यांनी केले. मुंबईमध्ये झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर शहीद झालेल्या शूरविरांच्या स्मरणार्थ आयोजित तालुकास्तरीय शहिद मॅरेथॉन स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते.जिल्हाभरातून ह्या स्पर्धेला उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. संत गाडगेबाबा स्पोर्ट्स क्लब आयोजित या स्पर्धेत भर थंडीत शेकडो चिमुकल्यासह आबालवृद्धही धावले. ही स्पर्धा उंबरकोन येथे ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे उदघाटन माजी सैनिक भाऊसाहेब बोराडे, वेदिका मंडलिक यांच्या हस्ते झाले. रमेश शिंदे आदी मान्यवरांनी खेळाडूंना परितोषिकांचे वितरण केले.ही स्पर्धा चार गटात पार पडली. यात १२ वर्षाखालील गटात ज्युनिअर घोटी एक्सप्रेस वेदिका बोराडे, नेहा बोराडे, कांचन शिंदे यांनी तर १४ वर्षाखालील गटात मनीषा शिंदे, रेणुका शिंदे, निर्मला घारे, त्र्यंबक चिमटे, कृष्णा सारूक्ते, सचिन सारु क्ते यांनी बाजी मारली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून धावपटू श्याम वाघ, वेदिका मंडलिक यांनी काम पाहिले.स्पर्धा यशस्वीतेसाठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डी. आर. वारु ंगसे, विलास बिरारी, अनंत भदाणे, विजय खेताडे, संध्या शेलार, कुसुम देसले, कविता गभाले आदी उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शिक्षक आणि ग्रामस्थांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन सुभाष भास्कर यांनी केले.
२६/११ शहिदांच्या स्मृतिनिमित्त उंबरकोन येथे मॅरेथॉन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 5:40 PM
घोटी : मॅरेथॉन स्पर्धा जीवनाला कलाटणी देतात. ह्या क्र ीडा प्रकारांतून निरामय आरोग्याची गुरु किल्ली लपलेली आहे. शिहदांच्या स्मृती चिरंतन राखण्यासाठी आयोजित केलेल्या स्पर्धा सर्वांना प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन कळसुबाई मित्रमंडळाने अध्यक्ष प्रसिद्ध गिर्यारोहक भगीरथ मराडे यांनी केले. मुंबईमध्ये झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर शहीद झालेल्या शूरविरांच्या स्मरणार्थ आयोजित तालुकास्तरीय शहिद मॅरेथॉन स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते.
ठळक मुद्देशिहदांच्या स्मृती चिरंतन राखण्यासाठी आयोजित केलेल्या स्पर्धा सर्वांना प्रेरणादायी