नांदगाव : राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम अंतर्गत शिधापत्रिकेच्या प्राधान्य द्यावे या मागणीसाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने गुरुवारी (दि.२२) नव्या मध्यवर्ती प्रशासकीय संकुलाबाहेर राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली.दरम्यान आंदोलकांना तहसीलदार उदय कुलकर्णी सामोरे गेले त्यांनी पुरवठा विभागाकडे प्राप्त झालेल्या एकूण २६२ दिव्यांग कुटूंबाचे अर्जाची पडताळणी करून आधार सिडींग नुसार तीस अर्जदारांना शिधापत्रिका देत असल्याचे जाहीर केले. तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेत असलो तरी एकूण सर्वच दिव्यांगांना शिधापत्रिकेचा लाभ मिळाला नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.पाच महिन्यापूर्वी दिव्यांगांना शिधापत्रिकेच्या लाभापासून वंचित राहावे लागत असल्याच्या मुद्दयांवर तहसीलदारांच्या दालनात झालेल्या चर्चेवेळी अंतोदय यादीत समावेश करून शिधापत्रिका देण्याचे पुरवठा विभागाने काबुल होते. मात्र त्यावर पुरवठा विभागाने कुठलीच कारवाई केली नसल्यामुळे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या वतीने राज्याच्या समन्वयक संध्या जाधव, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख चंद्रभान गांगुर्डे जिल्हाध्यक्ष दिलीप दिघे, संतोष मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष अनीस शेख, मनमाड शहर अध्यक्ष जाफर शहा, नांदगावचे शहराध्यक्ष राजू कटारे, ज्ञानेश्वर मुकुंद, दीपक सोळाशे, भाऊसाहेब पवार, हिरामण मनोहर आदींच्या नेतृत्वाखाली तालुक्याच्या विविध भागातून आलेल्या दिव्यांग बांधवानी दिवसभर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात रिपाईचे दिनकर धीवर देविदास मोरे ही सहभागी झाले होते.तालुक्यातील दिव्यांगांचा अंतोदय यादीत समावेश झाला नसल्याने शिधापत्रिकेवरील राष्ट्रीय सुरक्षा योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करूनही दुर्लक्ष होत असल्याने शेवटी गुरुवारी आंदोलन झाले.तहसीलदार उदय कुलकर्णी यांनी धरणेस्थळी येऊन आंदोलकांना लेखी आश्वासन दिले. त्यात प्राप्त एकूण २६२ दिव्यांग कुटुंबांचे अर्जाची पडताळणी केली असता ज्या शिधापत्रिका आधार सीडिंग होऊन ऑनलाईन प्रक्रियेमध्ये समाविष्ट आहेत. अशा ५८ अर्जदार दिव्यांग कुटुंबाना शासन परिपत्रकानुसार व त्याच्या पात्र योजनेन्वये तात्काळ राष्ट्रीय अन्न सुरक्षेचा लाभ सुरु करण्यात आलेला आहे.उर्वरित अर्जदार व्यक्तीचे आधार सीडिंग सुरु असून अर्जदारचे आधार कार्ड ऑनलाईन प्रणाली मध्ये नोंद करून त्यांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरु आहे तसेच ज्या दिव्यांग गरजू कुटुंबानी शिधापत्रिकेसाठी अर्ज केला आहे अशा ३० अर्जदार कुटुंबांची यादी निश्चित करून त्यांना शिधापत्रिका देण्याची तजवीज करत आहेत.असे कळविण्यात आले
दिव्यांगांना शिधापत्रिकेचा विषय लागला मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 9:18 PM
नांदगाव : राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम अंतर्गत शिधापत्रिकेच्या प्राधान्य द्यावे या मागणीसाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने गुरुवारी (दि.२२) नव्या मध्यवर्ती प्रशासकीय संकुलाबाहेर राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली.
ठळक मुद्देआंदोलनानंतर २६२ पैकी तीस कुटूंबाची यादी जाहीर