नांदूरवैद्य : शासनाने कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर नवरात्र उत्सवादरम्यान होत असलेले याञौत्सव बंद करण्याचे आदेश दिल्यामुळे अनेक छोटे मोठे व्यापारी तसेच फुल विक्रते व फुलांची लागवड करणारे शेतकरी यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे फुलशेतीला मोठा फटका बसला असून नवराञ दसरा तसेच दिवाळी सणांना झेंडूच्या फुलांना अनन्य साधारण महत्त्व असते. याच पाश्वर्भूमीवरअसल्याचे यावेळी इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, नांदगाव बुद्रुक, जानोरी, बेलगाव कुºहेआदीं गावांतील शेतकऱ्यांनी सांगितले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील झेंडूच्या फुलांची महागडी बियाणांची लागवड केली असून महागडी जंतूनाशक औषधांची फवारणी केली आहे. यामुळे पिक जोमाने बहरत असतांनाच शासनाने वणी येथील सप्तश्रृंगगडावरील उत्साहासह इतर ठिकाणचे याञौत्सव बंद झाल्यामुळे झेंडूच्या फुलांची मागणी घटली आहे. भावही मिळत नसल्यामुळे तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले असून सर्व खर्च वाया जाणार या भावनेने शेतकऱ्यांमध्यो नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे चिञ पाहावयास मिळत आहे. यावर्र्षी चांगला भाव मिळेल या भावनेने अनेक शेतकºयांनी वेगवेगळ्या जातीच्या झेंडूच्या फुलांचे नियोजन करत लागवड केली. महागडी खते, औषधे फवारणी करत फुले टवटवीत केली असतांनाच कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर बंद असलेली मंदिरे कमीतकमी नवरात्र उत्सवादरम्यान तरी उघडतील अशी मनामध्ये धारणा असतांना शासनाने सर्वच ठिकाणचे याञौत्सव बंद करण्याचे आदेश काढल्यामुळे कष्टाने पिकवलेल्या फुलांची मागणी घटली असून सर्व खर्च पाण्यात गेल्याचे येथील शेतकरी सांगत आहे.कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर मंदिरे तसेच धार्मिक याञौत्सव बंद नवरात्रीत सुरु होतील अशी मनामध्ये धारणा होती. परंतू नुकताच शासनाने दिलेल्या आदेशानुसार याञौत्सव बंद झाल्यामुळे कष्टाने तयार केलेल्या फुलांची मागणी घटली असून सर्व खर्च वाया जाणार आहे. शासनाने नवराञौत्सवासाठी मंदिरे खुली करण्याची गरज होती यामुळे अनेक छोट्या मोठ्या विक्रेत्यांना दिलासा मिळाला असता. - राजू काजळे, फूलशेती शेतकरीनवराञौत्सवसाठी तयार झालेली झेंडूची फूलशेती. याञौत्सव बंद झाल्यामुळे झेंडूच्या फुलांची मागणी घटली आहे. (१० नांदूरवैदद्य१)