नाशिक: समुद्री जीवांसह घोरपडसारख्या वन्यजीवांच्या अवयवाचा वापर करत बनविलेल्या ट्रॉफींची विक्री करत नागरिकांची अंधश्रध्देपोटी सर्रासपणे फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार पंचवटी भागात वनविभागाने उघडकीस आणला आहे. गोदाकाठालगतच्या दोन दुकानांवर नाशिक पुर्व वनविभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१८) छापा टाकला. या दुकानातून समुद्री जीवांचा वापर करत तयार केलेल्या आकर्षक १५ ट्रॉफी जप्त केल्या आहेत. येवलापाठोपाठ पंचवटी भागात झालेल्या या कारवाईने सागरी जीव अन्व न्यजीवांची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.भारतीय वन्यजीव कायद्याच्या अनुसुची-१मध्ये संरक्षण प्राप्त असलेल्या इंद्रजालसारख्या (सी फॅन्स व सी ब्लॅक कोरल्स) समुद्री जीवाची वैश्विक तपमानवृध्दी रोखण्यासाठी आणि सागरी जैविक अन्नसाखळी टिकवून ठेवण्यामध्ये महत्वाची भुमिका आहे. हा जीव एखाद्या वाळलेल्या रोपट्यासारखा दिसतो. गोदाकाठावरील सरदार चौकातील ह्यरामदरबार इन्टरप्रायजेसह्ण नावाच्या दुकानात अशाचप्रकारे समुद्री जीवांचा वापर करुन तयार केलेल्या ट्रॉफींची खुलेआम विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळताच पुर्व वनविभागाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांच्या आदेशान्वये सहायक वनसंरक्षक डॉ. सुजीत नेवसे, येवला वनक्षेत्रपाल अक्षय म्हेत्रे यांच्या पथकाने शिताफीने छापा टाकत दुकानमालक संशयित राजेश लक्ष्मण येवले (५२), रामसेतु पुलालगतच्या गणेश वस्त्र भांडारचालक संशयित तेजस प्रवीण सोनार (२५) यांना ताब्यात घेत सर्व साहित्य जप्त केले. या कारवाईत इंद्रजालपासून तयार केलेल्या १५ ट्रॉफी, शेकडो मोरपंखदेकील वन पथकाने हस्तगत केले आहे.-भोंदुगिरी करणाऱ्यांकडून समुद्री तसेच वन्यजीवांच्या अवशेषांपासून बनविलेल्या आणि फॅन्सी, ॲन्टीक वस्तु म्हणून विक्री केल्या जाणाऱ्या वस्तुंची खरेदी फॅशन म्हणून किंवा अंधश्रध्देपोटी करु नये, जेणेकरुन वनविभागाच्या कारवाईचा सामना करावा लागणार नाही. येवला तसेच शहरातील पंचवटी भागात केलेल्या कारवाईच्या मुळापर्यंत जाऊन हे रॅकेट उद्धवस्त करण्याचा वनविभागाचा प्रयत्न राहणार आहे.- तुषार चव्हाण, उपवनसंरक्षक नाशिक पुर्व विभाग
अंधश्रध्देच्या बाजारात सागरी जीवांचाही बळी; वनविभागाचे पंचवटीत दुकानांवर छापे
By अझहर शेख | Updated: August 18, 2021 16:57 IST
अंधश्रध्देच्या बाजारात आणले जाणारी समुद्री जीव सी फॅन, सी ब्लॅक कोरल्सची तस्करी गुजरातमधील भावनगरसह अन्य काही शहरांमधून होत असल्याचे प्रथमदर्शनी वनविभागाच्या तपासातून पुढे आले आहे.
अंधश्रध्देच्या बाजारात सागरी जीवांचाही बळी; वनविभागाचे पंचवटीत दुकानांवर छापे
ठळक मुद्देगोदाकाठावरील दोन दुकानमालक ताब्यातसागरी जैवविविधताही धोक्यातपंचवटी ते गुजरात सागरी किनाऱ्यांवरुन तस्करी