भारतीय वन्यजीव कायद्याच्या अनुसूची- १मध्ये संरक्षण प्राप्त असलेल्या इंद्रजालसारख्या (सी फॅन्स व सी ब्लॅक कोरल्स) समुद्री जीवाची वैश्विक तपमानवृद्धी रोखण्यासाठी आणि सागरी जैविक अन्नसाखळी टिकवून ठेवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. हा जीव एखाद्या वाळलेल्या रोपट्यासारखा दिसतो. गोदाकाठावरील सरदार चौकातील ‘रामदरबार एंटरप्रायजेस’ नावाच्या दुकानात अशाच प्रकारे समुद्री जीवांचा वापर करून तयार केलेल्या ट्रॉफींची खुलेआम विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळताच पूर्व वनविभागाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांच्या आदेशान्वये सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुजीत नेवसे, येवला वनक्षेत्रपाल अक्षय म्हेत्रे यांच्या पथकाने शिताफीने छापा टाकत दुकानमालक संशयित राजेश लक्ष्मण येवले (५२), रामसेतू पुलालगतच्या गणेश वस्त्र भांडारचालक संशयित तेजस प्रवीण सोनार (२५) यांना ताब्यात घेत सर्व साहित्य जप्त केले. या कारवाईत इंद्रजालपासून तयार केलेल्या १५ ट्रॉफी, शेकडो मोरपंखदेखील वन पथकाने हस्तगत केले आहे.
--इन्फो--
सागरी जैवविविधताही धोक्यात
स्वार्थापोटी मानवाकडून जमिनीवरील नैसर्गिक जैवविविधतेसह आता सागरी जैवविविधतेलाही नख लावण्यास सुरुवात केली आहे. अंधश्रद्धेच्या बाजारात इंद्रजालसारख्या जीवाचा बळी दिला जात असल्याचे उघडकीस आले आहे. नागरिकांनी यापासून सावध होणे गरजेचे असून, वन्यजीव कायद्यानुसार अशाप्रकारे सी फॅन्स किंवा सी ब्लॅक कोरल्सपासून बनविलेल्या शोपीस ट्रॉफी घरात बाळगणेदेखील वन-वन्यजीव कायद्यानुसार गुन्हा ठरतो.
---इन्फो--
पंचवटी ते गुजरात सागरी किनाऱ्यांवरून तस्करी
अंधश्रद्धेच्या बाजारात आणले जाणारी समुद्री जीव सी फॅन, सी ब्लॅक कोरल्सची तस्करी गुजरातमधील भावनगरसह अन्य काही शहरांमधून होत असल्याचे प्रथमदर्शनी वनविभागाच्या तपासातून पुढे आले आहे. पंचवटीतून थेट गुजरातच्या सागरी किनाऱ्यांपर्यंत या तस्करीचे धागेदोरे पोहोचलेले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
--कोट--
भोंदुगिरी करणाऱ्यांकडून समुद्री तसेच वन्यजीवांच्या अवशेषांपासून बनविलेल्या आणि फॅन्सी, ॲन्टीक वस्तू म्हणून विक्री केल्या जाणाऱ्या वस्तूंची खरेदी फॅशन म्हणून किंवा अंधश्रद्धेपोटी करू नये, जेणेकरून वनविभागाच्या कारवाईचा सामना करावा लागणार नाही. येवला तसेच शहरातील पंचवटी भागात केलेल्या कारवाईच्या मुळापर्यंत जाऊन हे रॅकेट उद्ध्वस्त करण्याचा वनविभागाचा प्रयत्न राहणार आहे.
-तुषार चव्हाण, उपवनसंरक्षक नाशिक पूर्व विभाग
180821\18nsk_44_18082021_13.jpg~180821\18nsk_45_18082021_13.jpg~180821\18nsk_46_18082021_13.jpg
समुद्री जीव~समुद्री जीव~समुद्री जीव सी फॅन्स (संग्रहित)