-----
महिलेचा विनयभंग करणाऱ्याविरुद्ध गुन्हा
मालेगाव : येथील नयापुरा भागात राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी ताह निसार अहमद याच्या विरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या ताह निसार अहमद याने अश्लील हावभाव करून विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे हे करीत आहेत.
----
सामान्य रुग्णालय परिसरातून दुचाकी लंपास
मालेगाव : येथील सामान्य रुग्णालय परिसरातून २५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याप्रकरणी योगेश रामचंद्र बच्छाव (रा. मुंगसे) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या मालकीची दुचाकी क्रमांक एमएच ४१ एव्ही ५६४९ ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.
----
मालेगाव - मनमाड रस्त्यावर बर्निंग कंटेनर; होरपळून दोघांचा मृत्यू
मालेगाव : मनमाड - मालेगाव रस्त्यावर कौळाणे शिवारात सोमवारी रात्री कंटेनर व ट्रकची समोरासमोर धडक झाली. या धडकेनंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. या आगीत कंटेनर चालक दीनदयाल (४०) (पूर्ण नाव माहीत नाही) व ट्रक चालक रामप्रसाद गाेपीलाल (२५) या दोघांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर ट्रकमधील मुकेशकुमार गोपीलाल हा जखमी झाला आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (दि.३१) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मनमाड - मालेगाव रस्त्याचे सिसमचे रॉड घेऊन मालेगावकडून मनमाडकडे जाणाऱ्या कंटेनर क्रमांक आर.जे. १४, जीजे ७११२ व कांदा घेऊन मनमाडहून मालेगावकडे येणाऱ्या ट्रक क्रमांक एच.आर. ४७, सी. ४३२७ यांची समोरासमोर धडक झाली. या धडकेनंतर दोघा वाहनांनी पेट घेतला. या आगीत ट्रक व कंटेनर चालकांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच मालेगाव अग्निशमन दल व तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन बंबांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. या अपघातामुळे मनमाड - मालेगाव रस्त्यावरील वाहतूक सुमारे ३ तास खोळंबली होती. आग आटोक्यात आणल्यानंतर दोन्ही वाहने रस्त्यावरून हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघाताचा पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एम. व्ही. मोरे करीत आहेत.
फोटो फाईल नेम : ०१ एमजेयुएन ०३ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगाव - मनमाड रस्त्यावर कौळाणे शिवारात ट्रक व कंटेनरने पेट घेतला.
----
===Photopath===
010621\01nsk_25_01062021_13.jpg
===Caption===
फोटो कॅप्शन बातमीसोबत दिले आहे.