पंचवटी : उन्हामुळे दरवर्षी शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडत असल्याने हिरव्या पालेभाज्यांची आवक घटते. यंदा मात्र पालेभाज्यांची आवक टिकून असून, बाजारभाव तेजीत आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (दि.२१) सायंकाळी ६० टक्क्यांपेक्षा जास्त शेतमालाची आवक झाली. सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीर ४० रुपये, मेथी ३२, कांदापात ३०, तर शेपू २८ रुपये जुडी या दराने विक्र झाली.उन्हाळ्यात पालेभाज्यांची आवक घटून बाजारभाव तेजीत असतात. मात्र यंदा उन्हाळ्याची तीव्रता अधिक असली तरी शेतातील पिकांना पाणी उपलब्ध होत असल्याने पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. आवक वाढली असली तरी हिरव्या पालेभाज्यांना मागणी कायम असल्याने बाजारभाव टिकून असल्याचे व्यापारी वर्गाने सांगितले. आगामी काही दिवस पालेभाज्यांची आवक टिकून राहण्याची शक्यता असल्याने बाजारभावदेखील टिकून राहतील असे बोलले जात आहे. बाजार समितीत हिरव्या पालेभाज्या विक्र ीसाठी दाखल होत असल्या तरी दुसरीकडे मात्र रस्त्यावर भरणाऱ्या भाजीबाजारात मोजक्याच ठिकाणी पालेभाज्या विक्र ीसाठी दिसत आहे. रस्त्यावर भरणारा भाजीबाजारात तसेच हातगाडीवर पालेभाज्यांचे दर तेजीत असून, ग्राहकांना कोथिंबीर ५० रुपये, मेथी ३५ ते ४० रुपये, कांदापात ३५, तर पालक १५ व शेपू ३० रुपये प्रति जुडी या दराने खरेदी करावी लागत आहे.
हिरव्या पालेभाज्यांची आवक वाढूनही बाजारभाव तेजीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:16 AM
उन्हामुळे दरवर्षी शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडत असल्याने हिरव्या पालेभाज्यांची आवक घटते. यंदा मात्र पालेभाज्यांची आवक टिकून असून, बाजारभाव तेजीत आहे.
ठळक मुद्देकोथिंबीर ४० रुपये, मेथी ३२, कांदापात ३०, तर शेपू २८ रुपये जुडी . पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवकरस्त्यावर भरणारा भाजीबाजारात तसेच हातगाडीवर पालेभाज्यांचे दर तेजीत