नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला विक्रीनंतर शेतकऱ्यांकडून घेतल्या जाणाºया अतिरिक्त दहा जुड्यांच्या अनधिकृत व्यवहारावर अखेर निर्बंध आले असून उपनिबंधकांनी याप्रकरणी बाजार समितीला असे प्रकार रोखण्याचे आदेश दिले असून, सदर प्रकार न थांबल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे़नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी आणला जातो. भाजीपाला विक्रीनंतर प्रत्येक वक्कलवर आडते-व्यापारी १० जुड्या अतिरिक्त घेत होते. याप्रकाराला शेतकरी संघटनेकडून सातत्याने विरोध केला जात होता. काही दिवस ही पद्धत बंद करण्यात आली होती. परंतु आडतदार व व्यापाऱ्यांकडून ही पद्धत पुन्हा सुरू करण्यात आली.याबाबत शेतकºयांची नाराजी व तक्रारींची दखल घेत शिवाजीराव कोठुळे, भाऊसाहेब गडाख व परिसरातील गावांमधील शेतकºयांनी याबाबत उपनिबंधक, कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडे तक्रार दाखल करून आंदोलनाचा इशारा दिलाहोता. या तक्रारीचीदखल घेत उपनिबंधक सहकारी व पणन संस्था यांनी सदर दहा अतिरिक्त जुड्या घेण्याची पद्धत बंद करण्याचे बाजार समितीला कळविले आहे़ तसेच ही पद्धत बंद केली नाही तर महाराष्ट्र कृषी उत्पन्नाची खरेदी-विक्री अधिनियम १९६३ मधील कलम ३९ प्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
बाजार समितीत अतिरिक्त जुड्यांची पद्धत अखेर रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 11:30 PM
कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला विक्रीनंतर शेतकऱ्यांकडून घेतल्या जाणाºया अतिरिक्त दहा जुड्यांच्या अनधिकृत व्यवहारावर अखेर निर्बंध आले असून उपनिबंधकांनी याप्रकरणी बाजार समितीला असे प्रकार रोखण्याचे आदेश दिले असून, सदर प्रकार न थांबल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे़
ठळक मुद्देलढ्याला यश : उपनिबंधकांकडून दखल