पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत काही वर्षांपूर्वी उभारलेल्या व नवीन बांधकाम सुरू असलेल्या गाळ्यांना कमी-अधिक प्रमाणात भाडे असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. नव्याने उभारण्यात येणाºया गाळ्यांनादेखील प्रतिदिन प्रती ५० पैसे स्केअर फूट दराने भाडे आकारणी करण्याबाबत काही व्यापारी बाजार समितीकडे पत्रव्यवहार करणार असल्याचे समजते. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत असलेल्या सेल हॉल समोरील कांदा- बटाटा गाळ्यांमध्ये बांधकाम करून नव्याने गाळे तयार करण्याचे काम बाजार समितीने काही दिवसांपूर्वीच सुरू केलेले आहे. सदर गाळ्याचा आकार १२ बाय २५ प्रमाणे आहे. या गाळ्यांना वार्षिक २४ हजार रुपये भाडे आकारणी केली जाणार आहे.जुन्या पत्र्याच्या १० बाय १० आकाराच्या गाळ्यांना वार्षिक १८ हजार रुपये भाडे बाजार समिती वसूल करते तर मग नव्याने उभारण्यात येणाºया गाळ्यांनादेखील प्रतिस्क्वेअर फूट ५० पैसे प्रतिदिन यानुसारच भाडे आकारणी करावी, असे व्यापाºयांचे म्हणणे आहे. नव्याने उभारण्यात येत असलेल्या गाळ्यांमध्ये आडतदार व व्यापाºयांना जागा दिली जाणार आहे.नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा-बटाटा गाळ्यांमध्ये बांधकाम करून ते गाळे आडत्यांना तसेच काही व्यापाºयांना अकरा महिन्यांच्या करारावर भाडेतत्त्वावर दिले जाणार आहे. सदर गाळ्यांची भाडेवाढ प्रतिवार्षिक केली जाणार आहे, तर जुन्या पत्र्याच्या गाळेधारकांना भाडेवाढ केली जाणार नाही. अनेक व्यापाºयांनी यापूर्वी पोटभाडेकरू ठेवून एकप्रकारे व्यवसाय सुरू केला होता. या पोटभाडेकरूंना लगाम बसावा, यासाठी बाजार समितीने गाळे उभारणी करून भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे.- शिवाजी चुंबळे, सभापती, बाजार समिती
गाळे भाडे आकारणीत बाजार समितीचा भेदभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 12:29 AM