पिंपळगाव बसवंत : गेल्या सात दिवसांपासून बंद असलेले पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव आजपासून पुन्हा सुरू झाले आहेत. सोमवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याचे तब्बल ६८१ ट्रॅक्टर व २३१ पिकप तर उन्हाळ कांद्याची २७६ ट्रॅक्टर आवक झाली आहे. त्यास जास्तीतजास्त १२५२ रुपये प्रति किंटल भाव जाहीर झाला. मात्र मागील आठवढ्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात घसरण दिसून आली.साप्ताहिक सुट्या, सण व वर्षा अखेर आदींमुळे कांदा लिलाव प्रक्रिया सात दिवस बंद होती. त्यामुळे सोमवारी (दि.५) लाल कांद्याची ट्रॅक्टर पिकप वाहनांमधून आवक झाली, त्यास कमीतकमी ७०० सरासरी ८५१ तर जास्तीत जास्त १००२ रुपये किंटल भाव जाहीर झाला. तर व उन्हाळ कांद्याची ट्रॅक्टर पिकप वाहन मधून क्विंटल आवक झाली त्यास कमीतकमी ७५१ सरासरी १०५० तर जास्तीत जास्त १२५२ रुपये किंटल भाव जाहीर झाला मागील सात दिवसांचा आलेख बघता भावात १०२ रुपयांची घसरण झाली असून कांद्याचे दर दिवसेंदिवस कमी होतांना दिसत आहेत.कोरोनाचा कहर वाढल्याने व लॉक डाऊनच्या भीतीने हॉटेल व्यवसायिकांनी देखील कांद्याच्या मागणीत कमालीची घट केली आहे. त्यामुळे कांद्याचे दर सद्याच्या परिस्थितीत हजार रुपयांच्या आत असून अजून कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे.मागील आठवड्यातदिनांक २६ मार्चलालकांदाकमीतकमी जास्तीजास्त सरासरी७०१ ११३२ ९५१उन्हाळ कांदा८०० १४३३ ११५१.......दि २७ मार्च........लाल कांदा७५१ ११६० ९५१उन्हाळ कांदा८०० १३११ ११५१बंद नंतर चालू आठवडासोमवार दि ५ एप्रिललाल कांदा७०० १००१ ८००उन्हाळ कांदा७५१ १२५२ १०००
सात दिवसांनी बाजारसमिती सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 6:32 PM
पिंपळगाव बसवंत : गेल्या सात दिवसांपासून बंद असलेले पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव आजपासून पुन्हा सुरू झाले आहेत. सोमवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याचे तब्बल ६८१ ट्रॅक्टर व २३१ पिकप तर उन्हाळ कांद्याची २७६ ट्रॅक्टर आवक झाली आहे. त्यास जास्तीतजास्त १२५२ रुपये प्रति किंटल भाव जाहीर झाला. मात्र मागील आठवढ्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात घसरण दिसून आली.
ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : कांद्याच्या दरात कमालीची घसरण