त्र्यंबकेश्वर : दीपावलीनिमित्त बाजारपेठेला झळाळी आली आहे. खरेदीसाठी महिलांसह ग्राहकांनी गर्दी केली आहे. कोरोनाचे सावट असतानादेखील दीपावलीचा उत्साह कमी न होता वाढला आहे. कपडे, किराणा दुकानात गर्दी उसळली आहे. लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या वस्तू, पंत्या, बोळके आदी खरेदीसाठी बाजारात चैतन्य आले आहे. गर्दीच्या ठिकाणी एकमेकांना स्पर्श होणार नाही याची लोक काळजी घेत आहे. नागरिक मास्कचा वापर करताना दिसत आहे. व्यापारी वर्गााने नो मास्क, नो एण्ट्रीचे फलक दर्शनीभागात लावले आहेत. महिलांनी आचाऱ्यांकडून तयार फराळ खरेदीला पसंती दिली आहे. लक्ष्मीपूजनासाठी नवीन कपडे परिधान करण्याची परंपरा असल्याने कपडे खरेदीला लोकांनी गर्दी केली आहे. कोरोनामुळे कोलमडलेली अर्थव्यवस्था काहीअंशी रुळावर येत आहे. मंदिर खुले केल्यावर रुतलेले अर्थच्रक फिरण्यास मदत होणार आहे.
दीपावलीनिमित्त त्र्यंबकेश्वरला बाजारपेठ सजली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 11:59 PM