नाशिक : शेतकऱ्यांना आपला माल कुठेही विकण्याची मुभा मिळाल्याने अनेक शेतकरी सध्या बाजार समितीच्या बाहेरच गाड्या लावून भाजीपाला विक्री करू लागले आहेत. अनेक किरकोळ व्यापारी या ठिकाणाहून भाजीपाला खरेदी करत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. दरम्यान, या ठिकाणी भाजीपाला खरेदी करणाºयांकडून शेतकºयांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकºयांनी महापालिकेने ठरवून दिलेल्या ठिकाणांवर आपली वाहने उभी केली तर थेट ग्राहकांना माल विकावा, असे आवाहन करण्यात आले आहे.आरटीओ कार्यालयासमोरील रस्त्यावर सायंकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात शेतकºयांच्या वाहनांची रांग लागत असून, यामुळे वाहतुकीची कोंडी होत असते.रस्त्यावर माल खरेदी करणाºयांमध्ये ७० टक्के व्यापारीच असतात. एखाद्या व्यापाºयाने शेतकºयाला पैसे दिलेच नाही तर त्याला तक्रार करणे गैरसोयीचे होते.शेतकºयांनी किरकोळ जरी असला तरी आपला माल बाजार समितीत आणावा, असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.मनपा आयुक्तांनी सर्व विभागीय अधिकाºयांना शेतकºयांसाठी जागा निश्चित केल्या आहेत. या ठिकाणीही माल विक्री करण्यास शेतकºयांना अडचणी येत नसल्याचे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचाही फज्जा उडत आहे. कारवाई झाल्यानंतर आता पेठ-दिंडोरी मार्गाला जोडणाºया मधल्या मार्गावर शेतकरी वाहने उभी करू लागले आहेत.
बाजार समितीबाहेरच भरतो बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 12:12 AM
शेतकऱ्यांना आपला माल कुठेही विकण्याची मुभा मिळाल्याने अनेक शेतकरी सध्या बाजार समितीच्या बाहेरच गाड्या लावून भाजीपाला विक्री करू लागले आहेत. अनेक किरकोळ व्यापारी या ठिकाणाहून भाजीपाला खरेदी करत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
ठळक मुद्देफसवणुकीची शक्यता : शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन