----
नदीपात्रालगतची अतिक्रमणे हटविण्याची मागणी
मालेगाव : पावसाळ्यापूर्वी व मोसम नदीला पूर येण्यापूर्वी नदीकाठावरील अतिक्रमणे महापालिका प्रशासनाने हटवावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून मोसम नदीला मोठ्या प्रमाणात पूर येत आहे. ऐनवेळी प्रशासनाची धावपळ होत असते. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पूरनियंत्रण रेषेलगतचे अतिक्रमण तातडीने हटवावे, अशी मागणी केली जात आहे.
----
मालेगावी इंधन दरवाढीचा निषेध
मालेगाव : कोरोना संसर्ग व लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण आहेत. नागरिकांना रोजगाराला मुकावे लागले आहे. असे असताना केंद्र शासनाने केलेली दरवाढ ही अन्यायकारक आहे. जनतेची आर्थिक फसवणूक होत आहे. इंधन दरवाढ त्वरित कमी करावी, महागाईला आळा घालावा या मागण्यांसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन सादर करण्यात आले. पीआरपीचे जिल्हाध्यक्ष भगवान आढाव यांनी अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांना निवेदन दिले.
----
सक्तीची वीजबिल वसुली थांबविण्याची मागणी
मालेगाव : वीज वितरण कंपनीकडून सध्या वीजबिलांची सक्तीची वसुली केली जात आहे. थकीत बिलांच्या वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित केला जात आहे. लॉकडाऊन काळात नागरिकांचा रोजगार बुडाला आहे. सध्या आर्थिक स्थिती चांगली नसल्याने वीज वितरण कंपनीकडून वीजपुरवठा खंडित केला जात आहे. वीज वितरण कंपनीने सक्तीची वीज बिल वसुली थांबवावी, अशी मागणी कली जात आहे.
----
स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी
मालेगाव : पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या स्वच्छता विभागाने शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. गटारी व रस्त्याच्या कडेला असलेली घाण मोकळ्या भूखंडांवरील कचरा उचलण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. सोयगाव नववसाहत भागात बऱ्याच ठिकाणी कचरा पडून आहे. महापालिकेच्या घंटागाड्या वेळेवर येत नसल्याने कचरा उचलला जात नाही. शहरात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी केली जात आहे.
----