पाऊस थांबल्यामुळे बाजार समितीत सोमवारी सायंकाळी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीला आणल्याने बाजारभाव घसरले. कोथिंबिरीपाठोपाठ मेथी व कांदापात कमीत कमी १० रुपये जुडी दराने विक्री झाली. पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना शेतातील शेतमाल काढणे सोपे झाले. त्यामुळे बाजार समितीत आवक वाढली होती. सायंकाळी बाजार समितीत शेतमालाची वाहने मोठ्या संख्येने दाखल झाल्याने काहीकाळ बाजार समिती आवारात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. आगामी काळात पावसाने उघडीप दिली तर आणखी मोठ्या प्रमाणात पालेभाज्या माल वाढला तर बाजारभाव काहीकाळ स्थिर राहतील, असे व्यापारी राजू भोरे यांनी सांगितले.
सोमवारी बाजार समितीत विक्रीला आणलेल्या शेतमालाला समाधानकारक बाजारभाव न मिळाल्याने त्यातच लागवड व दळणवळण खर्चदेखील न सुटल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.