मानोरी : येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथे आठवडे बाजार भरविण्यास प्रारंभ झाला आहे.ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत गावात आठवडे बाजार भरवण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन दर रविवारी दुपारी ३ वाजेनंतर बाजार भरविण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार प्रजासत्ताक दिनापासून आठवडे बाजाराला सुरुवात झाली.गावास तलाठी कार्यालय असल्याने जऊळके, सातारे, दहेगाव, पुरणगाव, शेवगे आदी गावांचा मोठ्या प्रमाणात संपर्कआहे. गाव परिसरात वीटभट्टी मजूर, शेतमजूर, शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना कामावरून इतर ठिकाणी बाजार करायला वेळ मिळत नव्हता. त्यामुळे बाजार भरविण्याची मागणी केली होती. आठवडे बाजारामुळे गावातच बाजार करण्याची सोय झाली आहे. यामुळे स्थानिकांनाही रोजगार उपलब्ध होणार आहे. यावेळी चंद्रभान ठाकरे, चंद्रभागाबाई दौंडे, भरत गोधडे, अनिल रसाळ, नंदू रसाळ, सुनील ढोकळे, ज्ञानेश्वर भातुडे, गोरख दौंडे, भागीनाथ रेंढे, अनिल बिडवे आदी उपस्थित होते.
पिंपळगाव लेप येथे आठवडे बाजारास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 10:19 PM