शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

बाजारपेठेला लग्नसराईचे वेध; उत्साहाचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:39 AM

गेल्या वर्षभर नोटबंदी आणि जीएसटीमुळे निराश असलेल्या बाजारात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संचारलेले उत्साहाचे वातावरण अजूनही कायम असून, बाजारपेठेला लग्नसराईचे वेध लागले असून, सोने, कपडे, वाहन खरेदीसाठी ग्राहक गर्दी करत आहेत. यंदा १ नोव्हेंबरला तुळशीविवाह झाल्यानंतर २१ नोव्हेंबरपासून लग्नसराई सुरू होणार असून, या महिन्यात विवाह असलेल्या कुटुंबांची बाजारात खरेदीसाठी लगीनघाई सुरू झाली आहे.

नाशिक : गेल्या वर्षभर नोटबंदी आणि जीएसटीमुळे निराश असलेल्या बाजारात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संचारलेले उत्साहाचे वातावरण अजूनही कायम असून, बाजारपेठेला लग्नसराईचे वेध लागले असून, सोने, कपडे, वाहन खरेदीसाठी ग्राहक गर्दी करत आहेत. यंदा १ नोव्हेंबरला तुळशीविवाह झाल्यानंतर २१ नोव्हेंबरपासून लग्नसराई सुरू होणार असून, या महिन्यात विवाह असलेल्या कुटुंबांची बाजारात खरेदीसाठी लगीनघाई सुरू झाली आहे.  यंदा तुळशीविवाहानंतर २१ नोव्हेंबरपासून विवाह मुहूर्त सुरू झालेत. त्यामुळे घोडे, बॅण्डवाले, मंगल कार्यालय, गुरुजी, केटरिंगला मागणी वाढली असून, लग्नकार्य असलेल्या कुटुंबातील कर्त्या व्यक्ती सध्या या सर्व गोष्टींची बुकिंग करण्यात व्यस्त आहेत. कापड बाजारात बस्ता घेण्यासाठी नव जीवनाची सुरु वात करणाºया वधू-वरासह त्यांचे पालक, नातेवाईक दुकानात गर्दी करीत आहेत. सराफा बाजार, भांडीबाजारातही ग्राहकांची वर्दळ वाढली आहे.  डेकोरेशनवाले, केटरर्सवाले, लग्नपात्रिक तयार करणे, इव्हेंट मॅनेजमेंटवाल्यांची लगबग सुरू झाली असून, यानिमित्ताने बाजारपेठेत कोट्यवधी रु पयांची उलाढाल होत आहे. सराफ बाजारात मंगळसूत्रांसह नेकलेस, टॉप्स, झुमके, कंबरपट्टा, अंगठी यांसह विविध प्रकारच्या दागिन्यांची मागणी वाढल्याचे सराफा व्यापाºयांनी सांगितले.  तर चांदीचे जोडवे, करंडे, फणी, केळीचे पान, कारल्याचा वेल तसेच बाळकृष्ण, गिफ्ट म्हणून ताटवाटी, गुलाबदाणी आदी वस्तूंबरोबरच अलीकडे हिºयाची मागणी वाढल्याचेही व्यापारी सांगत आहेत. त्याचप्रमाणे विवाह सोहळ्यानिमित्त मुहूर्त सुरू होण्याच्या कालावधीत गुलाब, लीली, मोगरा यांसह अन्य जातींच्या फुलांना मागणी वाढणार असल्याने फूल उत्पादक शेतकरी फूलबागांकडे खास लक्ष देत आहेत. स्टाइलसोबतच कम्फर्टेबल असावे पारंपरिक कपडे म्हणजे केवळ भरजरी कपडे किंवा हेवी ज्वेलरी असा अर्थ होत नाही. त्याउलट जे पारंपरिक कपडे आहेत ते सर्वांत जास्त कम्फर्टेबल असले पाहिजेत. आपल्या जुन्या मुळांना धरून राहत मात्र काळाप्रमाणे बदलत पारंपरिकता जपली गेली पाहिजे. हातमागावरचे विणलेले कापड ही पारंपरिक ओळख आहे. ते वापरून लग्नाच्या वेळी ज्यात वधूला वावरायला सोपं जाईल अशी डिझाइन्स तयार होत आहेत आणि ट्रेण्डमध्ये येत आहेत. मात्र कोणत्याच नववधूने ट्रेण्ड फॉलो न करता तिचे मन आणि आवड तिला काय सांगते ते फॉलो करावे, असा सल्ला फॅशन डिझायनरकडून दिला जात आहे. नवनवीन कलेक्शन्सकडे लक्ष श्रावण महिन्यापासून एकामागून एक सणांचा आणि उत्सवांचा सिलिसला सुरू होतो. वर्षभरातल्या सणा-समारंभांमध्ये आणि मुख्यत: लग्नांमध्ये कोणत्या प्रकारचा ट्रेण्ड असणार  आहे, कोणत्या रंगाचा प्रभाव डिझाइन्सवर असणार आहे,  कोणत्या प्रकारातली पारंपरिक डिझाइन्स आणि कपड्याचा कोणता प्रकार अधिक पाहायला मिळणार आहे, या सगळ्यांचा खूप आधी अभ्यास करून सर्व फॅशन डिझायनर्स दरवर्षी आपापले ‘कलेक्शन’ आणत असतात. या वर्षीही नवनवीन कलेक्शनसाठी सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.