शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

रविवारच्या दिवशी बाजारपेठा फुल्ल - शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी पालकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2020 5:57 PM

शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या मेनरोड आणि रविवार कारंजा येथे दुपारी ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे दिसून आले. विशेषत: शालेय साहित्यांची खरेदी करण्यासाठी पालक बाहेर पडल्याने बाजारपेठेत गर्दी दिसून आले.

ठळक मुद्देदुकाने सुरू झाल्याने बाजारपेठेत गर्दी रविवारी सार्वजनिक सुटीमुळे बाजारपेठ फुल्ल साप्ताहिक सुटीमुळे रविवारी बाजारपेठ फुल्ल

नाशिक : लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर शनिवापासून बाजारेपेठेतील सर्व दुकाने सुरू झाल्याने बाजारपेठेतील गर्दी वाढू लागली आहे. रविवारी सार्वजनिक सुटी असल्याने बाजारपेठेत अधिक गर्दी झाल्याचे दिसून आले. शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या मेनरोड आणि रविवार कारंजा येथे दुपारी ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे दिसून आले. विशेषत: शालेय साहित्यांची खरेदी करण्यासाठी पालक बाहेर पडल्याने बाजारपेठेत गर्दी दिसून आले.

शहरातील दुकाने सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी बाजारातील सर्वच रस्त्यांवर ग्राहकांची गर्दी दिसून आली. अत्याश्यक सेवेतील दुकाने यापूर्वीच सुरू होती आता आणखी दुकाने सुुरू झाल्याने बाजारपेठदेखील गजबजली आहे. रस्त्यांदर दुकाने थाटणाऱ्यांची संख्या दोन दिवसांत अधिक वाढली आहे. विशेषत: शालेय साहित्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होताना दिसते. रस्त्यांवरील विक्रेत्यांकडेदेखील बूट, वॉटरबॉटल, कम्पास, टिफीन बॉक्स, टिफीन बॅग्स आदी साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहे.  रविवार कारंजा येथील किराणा व्यापाऱ्यांकडील गर्दी रविवारी वाढल्याने रस्त्यांवर वाहनांची कोंडी झाली होती. ग्राहक चारचाकी, दुचाकीने खरेदीसाठी आल्यामुळे बाजारपेठेत वाहनांची कोंडी होत असल्याचे चित्र आहे. मेनरोडलादेखील वाहनांच्या गर्दीमुळे कोंडी अधिकच वाढते. नाशिकरोड येथील बिटको चौक, वॉस्को चौक तसेच स्टेट बॅँक चौकातील बाजारपेठ, मिनारोड येथे गर्दी झाली आहे. सिडको, सातपूर, पंचवटीतही गर्दी वाढल्याचे दिसते. 

टॅग्स :MarketबाजारNashikनाशिकShoppingखरेदीSchoolशाळा