वणी : अवघ्या आठवडाभरावर दिवाळी येऊन ठेपली तरी ग्राहकांअभावी बाजारपेठा थंडावलेल्या वाटत असून ग्राहकांची प्रतिक्षा करण्याची वेळ व्यावसायिकांवर आली आहे. आठवडाभरात दिवाळी सणाची सुरूवात होणार आहे. सणानिमित्त आर्थिक उलाढाल होउन चार पैसे मिळतील ही व्यावसायिकांची अपेक्षा आहे. त्यामुळे आपापल्या व्यवसायात त्यांनी मोठी गुंतवणुक केली आहे. मात्र बाजारपेठा अजुनही थंडावलेल्या असल्याने व्यापारीवर्ग चिंतामग्न झाला आहे. दिवाळी सणाचा मोठा ग्राहक हा शेतकरी वर्ग आहे. सुमारे ७५ टक्के जवळपास शेती व्यवसाय करणारा हा वर्ग आहे. शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळाले तर शेतकºयाच्या हातात पैसा येईल व त्यांनी मुलभुत गरजा भागविणे सोपे जाईल. शेतीचे नियोजन आखून हौसमौजेसाठी सणानिमित्त पैशाचा विनीयोग खरेदीसाठी केला व्यवसायिकांनाही गती येईल. दरम्यान गेल्या काही दिवसांपासुन कांद्याला समाधानकारक दर मिळत आहे मात्र उपबाजारात व बाजारसमतिीत कांदा विक्र ी साठी येणारे शेतकरी हे प्रामुख्याने कळवण देवळा चांदवड सटाणा तालूक्यातुन येतात. त्या तुलनेत दिंडोरी तालूक्यात उत्पादकांची संख्या कमी आहे त्यामुळे स्वाभिवकत: हे शेतकरी आपापल्या भागातील दुकांनामधुन खरेदी करतात. त्यामुळे त्याचा फायदा तालुक्यातील व्यावसायिकांना होत नाही. दरम्यान स्थानिक व्यावसायिकांचे डोळे आता टमाट्याच्या आर्थिक उलाढालीकडे लागलेले आहेत. टमाट्याला सध्या दर समाधानकारक असुन उत्तरोत्तर ते अजुन वाढण्याची शक्यता आहे.याची दुसरी बाजु अशी की अतिवृष्टीमुळे टमाट्याचे नूकसान झाले असुन मोठ्या प्रमाणावर घट आली आहे. सुमारे ५० टक्के इतक्या नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. टमाट्याला मागणी वाढली आहे त्यामुळे भावही वाढलेले आहेत ज्या शेतकर्यांचा टमाटा बाजारसमित्यांमधे येतो त्यांच्यावरच व्यावसायिक यांच्या नजरा लागलेल्या आहेत. भ्रमणध्वनी विक्र ेते, रेडीमेड तसेच कपड्यांचे दुकाने, पादत्राणे, भांङ्याची दुकाने विविध शोभेच्या वस्तुंची दुकानेही ग्राहकांच्या प्रतिक्षेत आहेत.
सणासुदीच्या तोंडावर बाजारपेठा थंडावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 2:59 PM