होळीनंतरच्या चतुर्थीला याठिकाणीरथोउत्सवाला मोठा उत्साह असतो. काळे व भोज परिवाराला रथोउत्सवाचा मान आहे. गावाच्या पश्चिमेला असलेल्या जानोसा मंदिरात रथो उत्सवाची सांगता झाली. भाविकांनी राञी उशीरापयॅत दशॅनासाठी गदीॅ केली होती. यानिमित्त कुस्त्यांची दंगल व व लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्र म संपन्न झाले. कसबे-सुकेणे ग्रामस्थ व परीसरातील भाविक या उत्सवात सहभागी झाले.देवाचे लग्न,आरत्या, तेलवण , हळद , मल्हारी गाणे , मांडव , देवाच्या मंडावळ्या, काळे- भोज परिवाराचा रथाचा मान आण िरंगांची उधळण आणि रंगात न्हाऊन निघालेले गावकरी भाविक असा माहोल कसबे सुकेणे गावात होता. शेकडो वर्षांची परंपरा या गावाने अखंडपणे जपली असून सुकेणेकरांच्या दारी मांडव पडल्याने आज चतुथीॅला सारा गाव देवाच्या लग्नाच्या लगीनघाईत होता.
कसबे सुकेणेला लागले देवाचे लग्न !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 1:02 PM
कसबे सुकेणे: येथील ग्रामदैवत भैरवनाथ- जोगेश्वरी मातेचा ग्रामउत्सव व रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कसबे सुकेणे येथे गावाच्या मध्यवर्ती भागात भैरवनाथ मंदिर असून ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आहे.सालाबाद प्रमाणे यंदाही हा यात्रेचा रथ सोहळा संपन्न झाला. दरवर्षी याठिकाणी होणारा देवाचा विवाह सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
ठळक मुद्दे शेकडो वर्षांची परंपरा ; भैरवनाथ-जोगेश्वरी याञोत्सवाची सांगता