खामखेडा : सध्या सर्वत्र पुन्हा विवाहसमारंभाची गर्दी सुरु झाली असून, पाहुणे मंडळीची वर्दळ वाढली आहे. एकेका दिवशी पाच-सहा विवाहांना हजेरी लावणारी मंडळी भोजन करणे टाळु लागल्याने वधु पित्याने तयार करु न ठेवलेले अन्नाची नासाडी होत आहे.मे महिना लग्नासाठी महत्वाचा आणि धावपळीचा असतो. मे महिन्यात विवाहाच्या तिथी देखिल महत्वाच्या असल्याने सर्वांचीच घावपळ होते. त्यात काही ठराविक तारखेला लग्न मुहूर्त असल्याने नोकरी, व्यसाय सांभाळूनबेलाविलेल्या प्रत्येकाच्या विवाहाला जाणे म्हणजे करसत करावी लागते. तेव्हा कोणी, कोठे आणि कोणत्या लग्नाला जायचे हे प्रथम प्राधान्याने ठणवावे लागते. शिवाय या उन्हाच्या त्रासात लग्नाला हजेरी लावावी लागते. परिणामी चार लग्नापैकी कोणत्या तरी एखाद्या लग्नात जेवणे भाग पडत असल्याने बऱ्याच लग्नाच्या ठिकाणी येणारे लोक व प्रत्यक्ष जेवणाच्या पंगती याचा ताळ-मेळ बसत नसल्याने अन्न मोठ्या प्रकाणात शिल्लक राहुन अन्नाची नासाडी होत आहे.(फोटो ०२ भोजनावळी)
विवाहाची गर्दी अन् अन्नाची नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 5:08 PM
खामखेडा : सध्या सर्वत्र पुन्हा विवाहसमारंभाची गर्दी सुरु झाली असून, पाहुणे मंडळीची वर्दळ वाढली आहे. एकेका दिवशी पाच-सहा विवाहांना हजेरी लावणारी मंडळी भोजन करणे टाळु लागल्याने वधु पित्याने तयार करु न ठेवलेले अन्नाची नासाडी होत आहे.
ठळक मुद्देयेणारे लोक व प्रत्यक्ष जेवणाच्या पंगती याचा ताळ-मेळ बसत नसल्याने अन्न मोठ्या प्रकाणात शिल्लक राहुन अन्नाची नासाडी होत आहे.