सुरगाणा : गीताई सांस्कृतिक शैक्षणिक व वैद्यकीय सेवा संस्था भदर, आदर्श सेवा मंडळ कारंजुल (सु) व आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळवण यांच्या संयुक्त विद्यमाने भदर येथे एकावन्न आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला.या विवाह सोहळ्यास खासदार हरिश्चंद्र चव्हाण, कलावती चव्हाण, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, विकास देशमुख, समीर चव्हाण, रंजना लहरे, चिंतामण गावित, भाजपाचे तालुकाध्यक्ष रमेश थोरात, भदरचे सरपंच झंपाबाई थोरात, वसंत राठोड, शांताराम थविल, एकनाथ चौधरी, पोपट पवार, कैलास जाधव, पी. के. चव्हाण, प्राचार्य सी. जी. दिघावकर, एल. पी. चव्हाण, ललित चव्हाण, नगरसेवक दीपक थोरात, राजूबाबा शेख, अकील पठाण, दिनकर पिंगळे, सामाजिक कार्यकर्ते धर्मेंद्र पगारिया, राहुल आहेर, विजय पवार, रोशन पगारे, विजय कानडे, गीताबाई देशमुख, प्रकल्प कार्यालयाचे सहायक प्रकल्प अधिकारी एस. टी. बागुल, पवार आदी उपस्थित होते.यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष जाधव म्हणाले, सामुदायिक विवाह ही सर्वच समाजात काळाची गरज निर्माण झाली आहे. मुलांचे विवाह करण्यास खर्च खूप मोठा असतो. शासनाची कन्यादान योजना महत्त्वपूर्ण आहे. हरिश्चंद्र चव्हाण यांनी समाज कल्याण सभापती असताना १९८१ सालापासून सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करत आले आहे. भाजपा सरकार आदिवासी समाजाच्या पाठीशी उभे आहे. विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचावा याकरिता कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश, उज्ज्वला गॅस योजना, पंतप्रधान आवास योजनांचा लाभ आदिवासी बांधवांनी घेऊन जिवनात परिवर्तन घडवावे असे आवाहन त्यांनी केले. विवाह सोहळा यशस्वीपणे पार पाडण्याकरिता रामभाऊ थोरात, केशव चौधरी, पोपट पवार, दौलत जाधव, हिरामण देशमुख, लक्ष्मण पवार, रामदास चौधरी आदीनी प्रयत्न केले.या विवाह सोहळ्यात रानविहीर, करंजुल (सु, भवानदगड, तळपाडा, भदर, लहानघोडी, देवलदरी, नवापूर आदी भागातील वधू-वर उपस्थित होते.
एकावन्न आदिवासी जोडप्यांचा विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:58 AM
सुरगाणा : गीताई सांस्कृतिक शैक्षणिक व वैद्यकीय सेवा संस्था भदर, आदर्श सेवा मंडळ कारंजुल (सु) व आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळवण यांच्या संयुक्त विद्यमाने भदर येथे एकावन्न आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला.
ठळक मुद्देभदर : गीताई सांस्कृतिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय सेवा संस्थेचा उपक्रमसामुदायिक विवाह ही सर्वच समाजात काळाची गरज