शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

नांदगावी चिमुकल्यासह विवाहितेची आत्महत्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 2:19 PM

नांदगाव : गणेशनगर परिसरात एका विवाहितेने दीड वर्षाच्या मुलाला गळफास लावून आणि नंतर स्वत: गळफास लावून आत्महत्या केल्याच्या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

नांदगाव : गणेशनगर परिसरात एका विवाहितेने दीड वर्षाच्या मुलाला गळफास लावून आणि नंतर स्वत: गळफास लावून आत्महत्या केल्याच्या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. नांदगाव तालुक्यातील माणिकपुंजच्या गणेश नगर वस्तीत भरदिवसा हा प्रकार घडला. या प्रकरणी मृत विवाहितेचा पती गोरख मेंगाळ याने पत्नी राहीबाई हिने आपल्या मुलाचा गळफास लावून खून केला व नंतर स्वत:स गळफास लावून आत्महत्या केल्याची फिर्याद नांदगाव पोलिसात मंगळवारी रात्री दोन वाजता दिली. मृताच्या आई वडिलांनी याप्रकरणी आपलीतक्र ार नसल्याचे सांगितले असल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.चार वर्षापूर्वी कुसुमतेल येथील राहीबाईचा विवाह माणिकपुंज गावच्या गणेशनगर वस्तीत राहणाऱ्या गोरख मेंगाळ यांचेशी झाला. त्यानंतर संदीप या मुलास राहीबाईने जन्म दिला. यंदाच्या दिवाळीला राहीबाई माहेरी आली होती. आठ दिवस राहून गेली. वैवाहिक जीवनाबद्दल तिने कधीच तक्र ार केली नव्हती असे तिचे वडील विलास भूतांबरे यांचे म्हणणे आहे. हे कसे घडले हेच कळत नाही अशी प्रतिक्रि या त्यांनी दिली.१२ नोव्हेबर रोजी तिचा पती गोरख खडी क्र शरच्या कामावर गेला तर दीर शरद मेंगाळ व त्याची पत्नी शेतात कामाला गेले. सायंकाळी शेतातून परत आलेल्या शरद याला घराचा बंद दरवाजा खटखटावून आतून प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून छपरावर जाऊन कौले उचकावून आत बघितले असता पुतण्या संदीप व राहीबाई गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. यामुळे घाबरलेल्या शरद याने तातडीने गोरखला फोन करून बोलावून घेतले. पोलीस पाटील सदाशिव मेंगाळ यांनी पोलिसांना कळवले. पोलीस आल्यानंतर दोन्ही मृतदेह खाली उतरविण्यात आले.घराच्या वाशाला नायलाँन दोर अडकवून पलंगाच्या कडेला उभे राहुन तिने उडी घेतल्याने गळफास आवळला गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तिचे सासू सासरे गेली सहा वर्षे वनविभागाच्या जमिनीवर खोपीत राहतात. घरी पती, दीर, त्याची पत्नी जाईबाई व राहीबाई आणि संदीप असे राहत असत. शवविच्छेदनात सकृतदर्शनी गळफासाने मृत्यू झाल्याचे दिसत असून अंगावर इतर जखमा नाहीत असे डॉ. रोहन बोरसे यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

टॅग्स :Nashikनाशिक