मालेगाव : खोटी माहिती, कागदपत्रे तसेच घराचा खोटा पत्ता देऊन विवाहितेशी लग्न करून तिला माहेरी पाठवून देऊन विश्वासघात व फसवणूक करणाऱ्या पतीसह लग्न जमविणाऱ्या दलालांविरुद्ध आझादनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. जरीनानाज इसरार खान ऊर्फ मरीना मोहंमद उमर, रा. मोहंमदअली रोड या महिलेने फिर्याद दिली. एक वर्षापूर्वी इसरार खान, रा. खारघर, नवी मुंबई याच्याशी तिचा विवाह झाला. रफीक एजंट, हसन एजंट, रेहाना एजंट, एजाज एजंट यांनी तिचे लग्न जमवून दिले होते. लग्नकर्तेवेळी पती व दलालाने तिला खोटी माहिती व कागदपत्रे तसेच इसरार खानचा खोटा पत्ता देऊन त्याच्याशी लग्न लावून दिले. लग्नानंतर सासरी नेऊन दुसऱ्या दिवशी माहेरी पाठवून दिले. त्यानंतर तिचा पती इसरार खान अद्याप तिला घेण्यास आला नाही. दलालांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तिचा विश्वासघात करुन फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.
लग्नात फसवणूक करून विवाहितेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2016 10:51 PM