नाशिक : माहेरून दीड लाख रुपये आणावेत, यासाठी विवाहितेस मारहाण करून तिचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या सासरच्या नातेवाईकांवर भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ जुने नाशिक परिसरातील बागवानपुरा येथे राहणाऱ्या समीना शफि क शेख यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या जागेची विक्री करून मिळालेल्या रकमेपैकी ५० हजार तसेच दीर रफि क याची न्यायालयातील केस निकाली काढण्यासाठी एक लाख असे दीड लाख रुपये आणावेत, यासाठी पती शफीक शेख व सासरचे पाच नातेवाईक मारहाण व छळ करीत होते़ या प्रकरणी समीना शेख यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे करीत आहेत़ (प्रतिनिधी)