शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

जीपची दुचाकीला धडक : तीन वर्षाच्या चिमुकल्यासह दाम्पत्य ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 6:21 PM

काही वेळेतच शववाहिकेला घटनास्थळी पाचारण करण्यात येऊन चौघांचे मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकिय रूग्णालयात पाठविले.

ठळक मुद्देगोळशी नाल्यावरील पूलावर अपघात फरार जीपचालकाविरूध्द गुन्हा दाखल

नाशिक : गिरणारेजवळील ओझरखेड येथून दरी मातोरी रस्त्याने मखमलाबादकडे जाणाऱ्या शेतमजूरांच्या दुचाकीला समोरून भरधाव आलेल्या पीकअप जीपने सोमवारी (दि.१३) दुपारी धडक दिली. या धडकेत तीन वर्षाच्या मुलासह त्याचे आई-वडील व दुचाकीचालक असे चौघे जागीच ठार झाले. अपघात इतका भीषण होता की चौघांचे मृतदेह दूरवर फेकले गेले. अपघातानंतर जीपचालक वाहन सोडून फरार झाला आहे.सोमवारी दुपारच्या सुमारास मखमलाबादच्या दिशेने दुचाकीवरून (एम.एच१५ सीएल २९८८) लहान चिमुकल्याला घेऊन तीघे शेतमजुर प्रवास करत होते. याचवेळी मखमलाबाद बाजूने भरधाव जाणा-या पीकअप जीपच्या (एमएच१५ ईजी९६३३) चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत त्यांच्या दुचाकीला धडक दिली. हा अपघात गोळशी नाल्यावरील पूलावर झाला. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील चौघांचे मृतदेह दूरवर फेकले गेले. या अपघातात केशव खोडे व त्यांची पत्नी मीराबाई खोडे (सर्व रा.ओझरखेड) आणि तीन वर्षाचा मुलगा अनिल यांसह दुचाकीचालक दिलीप नामदेव दिवे (रा.सापगाव, ता.त्र्यंबकेश्वर) हे चौघे जागीच ठार झाले. अपघात घडताच घटनास्थळावरून जीपचालकाने अपघातग्रस्त वाहन सोडून पलायन केले.आजुबाजूच्या नागरिकांनी तत्काळ घटनेची माहिती म्हसरूळ पोलिसांना दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरिक्षक पंढरीनाथ ढोकणे हे गुन्हे शोध पथक व गस्तीपथकासह घटनास्थळी पोहचले. दरी-मातोरी रस्त्यावरील वाहतूक पोलिसांनी सुरळीत करत नागरिकांच्या मदतीने छिन्नविन्न अवस्थेत पडलेले मृतदेह झाडाचा पाळापाचोळा व कापडाने झाकून पंचनामा केला. काही वेळेतच शववाहिकेला घटनास्थळी पाचारण करण्यात येऊन चौघांचे मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकिय रूग्णालयात पाठविले. या अपघातप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी फरार जीपचालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. आरटीओकडे असलेल्या जीपच्या नोंदणीकृत क्रमांकावरून या चालकाचा शोध घेतला जात असून त्याला लवकरच अटक केली जाईल असे ढोकणे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयAccidentअपघातDeathमृत्यू