सिन्नर : येथील हुतात्मा स्मारकाच्या दुरूस्ती व सुशोभीकरणाच्या कामास एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, पहिल्या टप्प्यात ११ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. हुतात्मा स्मारकाच्या नूतनीकरणाच्या कामास नुकताच प्रारंभ करण्यात आला असून, त्यामुळे हुतात्मा स्मारकास झळाळी येणार आहे.पहिल्या टप्प्यातील ११ लाख रुपयांच्या निधीतून करण्यात येणाºया कामांचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे, नगराध्यक्ष किरण डगळे यांच्या उपस्थित झालेल्या कार्यक्रमात आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते करण्यात आला. यात स्मारकाची वास्तू दुरूस्त करण्याबरोबरच परिसर सुशोभीकरण करण्यात येणार आहे. माजी सैनिक हरिश्चंद्र गुजराथी यांनी पाच हजार रुपयांबरोबरच सुशोभीकरणासाठी निधी देण्याचे जाहीर केले. जिल्ह्यातील ६ स्मारकांना पहिल्या टप्प्यात ५८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. सहा पैकी सिन्नरच्या स्मारकाचे सर्वात अगोदर सुशोभीकरणाच्या कामास सुरुवात करण्यात आली असून, यात छप्पर, फर्निचर, मूळ इमारत दुरूस्ती, फरशी आदी कामे होणार आहेत. मंजूर झालेल्या एक कोटी रु पयातून संरक्षक भिंत, चार प्रवेशद्वार, स्वच्छतागृह, परिसर सुशोभीकरणाचे काम होणार आहे. नगराध्यक्ष डगळे यांनी प्रास्ताविकेतून कामाची माहिती दिली. सिन्नर वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे, गटनेते व मविप्रचे संचालक हेमंत वाजे, उदय सांगळे, पाणी पुरवठा सभापती शैलेश नाईक, पंकज मोरे, गोविंद लोखंडे, सोमनाथ पावसे, रामनाथ लोणारे, मल्लू पाबळे, ज्योती वामने, निरु पमा शिंदे, सुजाता भगत, माजी सैनिक हरिश्चंद्र गुजराथी, मधुकर सोनवणे, उत्तम खैरनार, जग्गनाथ केदार, बाजीराव बोडके, फुलचंद पाटील, विजय पवार, मधुकर जाधव आदी उपस्थित होते.
हुतात्मा स्मारकाला मिळणार झळाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 11:46 PM