चांदवड : येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने मंगळवारी (दि. ३०) दुपारी चांदवड तहसील कार्यालयावर रेणुका देवी मंदिर हट्टीपासून मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व कॉ. हनुमंत गुंजाळ, राजाराम ठाकरे, शब्बीर सय्यद, तुकाराम गायकवाड, भाऊसाहेब मोरे, नाना पवार आदींनी केले. मोर्चाच्या वतीने तहसीलदार डॉ. शरद मंडलिक यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात चांदवड गायरान जमीन जागेवर गट नंबर ७३१ मधील सर्व घरे व झोपड्या तसेच वनखात्याच्या चांदवड शहरालगतच्या जमिनींवर घरे व झोपड्या करून राहत असलेल्या सर्व घरांची नोंद करून ती त्यांच्या नावे करण्यात यावी व त्यांना घरपट्टी लागू करावी, तेथे पिण्याच्या पाण्याची व विजेची व्यवस्था करावी़ निवेदनावर कॉ. नंदाबाई मोरे, दौलत वटाणे, सुरेश पवार, शांताराम गावित, शिवाजी सोनवणे, रूपचंद ठाकरे, ताईबाई पवार, गणपत गुंजाळ, बाळू सोनवणे, कारभारी माळी, रामू बाविस्कर, शांताराम पवार, शिवमन गोधडे, शब्बीर सय्यद, भाऊसाहेब मोरे, यादव गोधडे, कॉ. डोंगर गोधडे, गणेश पवार, ज्ञानेश्वर पवार आदींसह महिला व पुरुषांच्या सह्या आहेत. चांदवड शहरामध्ये नगर परिषदेच्या हद्दीमध्ये अतिक्रमण करून राहत असलेली घरे राहणाºयांच्या नावे करावी, चांदवड तालुक्यामध्ये वनजमिनीवर पिढ्यान्पिढ्या सर्व आदिवासी लोकांच्या घरांची व झोपड्याची नोंद करून घरपट्टी लागू करावी, तालुक्यातील सर्व वनदावे मंजूर करून ती पात्र व गायरान जमीन कसणाºयांच्या नावे करण्यात यावे, चांदवड तालुक्यात वनखात्याच्या कर्मचाºयांची दादागिरी व मनमानी बंद करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
पण्याच्या पाण्याची व विजेची व्यवस्था करावी चांदवडला मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:42 AM
चांदवड : येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने मंगळवारी (दि. ३०) दुपारी चांदवड तहसील कार्यालयावर रेणुका देवी मंदिर हट्टीपासून मोर्चा काढण्यात आला.
ठळक मुद्दे घरपट्टी लागू करावीविजेची व्यवस्था करावी़